Jayant Patil on Sharad Pawar | ‘शरद पवारांवर टीका करणं ही देशात आणि महाराष्ट्रात फॅशन झालीय’ – जयंत पाटील

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil on Sharad Pawar | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर टीका करणं ही देशात आणि महाराष्ट्रात फॅशन (fashion) झाली असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना पाटलांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं.

 

जातीयवादी शक्ती या सत्तेत परत बसल्या तर पाकिस्तानसारखी (Pakistan) परिस्थिती करून ठेवतील. लोकांची माथी भडकावायची आणि लोकांना मूळ विषयापासून भरकटावायचं काम चालू आहे. एसटीच्या (ST Workers Strike) संपात एक बुजगावणं उभं केलं आता भोंगा घेऊन नवीन बुजगावणं उभं केलं असल्याचं पाटील म्हणाले.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेचा कोल्हापूरमध्ये (Kolhapur) समारोप झाला आहे.
यावेळी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची भाषणं झालीत. यामध्ये प्रत्येक नेत्याने विरोधी पक्ष भाजपवर आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
त्यासोबतच मंत्री धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये मुख्यमंत्री (CM) राष्ट्रवादीचाच व्हावा, असं म्हटलं आहे.

 

दरम्यान, 2024 ला जेव्हा निवडणुका (Elcetion) होतील तेव्हा एकच इच्छा आहे.
2024 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झालाच पाहिजे, असा संकल्प आज आपण करूया, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Jayant Patil on Sharad Pawar | Criticism of Sharad Pawar has become a fashion in the country and in Maharashtra Jayant Patil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा