Jayant Patil On Shinde-Fadnavis Govt | निर्भया फंडाअंतर्गत मिळालेल्या गाड्या एकनाथ शिंदेंच्या आमदारांच्या सुरक्षेसाठी?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil On Shinde-Fadnavis Govt | जून महिन्यात मुंबई पोलिसांनी २२० बलेरो, ३५ एर्टीगा, ३१३ पल्सर बाईक्स आणि २०० ऍक्टिवा गाड्या विकत घेतल्या होत्या. २०१३ मध्ये केंद्रात सत्तेत असलेल्या तत्कालीन काँग्रेस सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी सुरु केलेल्या निर्भया फंडाअंतर्गत मिळालेल्या ३० कोटी रुपयांमधून या गाड्या खरेदी करण्यात आल्या. या निर्भया पथकासाठी नियोजित निधीमधून खरेदी करण्यात आलेली पोलिस वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) यांनी केला आहे. (Jayant Patil On Shinde-Fadnavis Govt)

 

मुंबईमधील महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या या गाड्या शिंदेंबरोबर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यासाठी वापरली जात असल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात बातमीची कात्रणे Social Media वर टाकत जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांना लक्ष्य केले. जुलै महिन्यापासून निर्भया निधीअंतर्गत मिळालेल्या पैशांमधून विकत घेतलेली वाहने आमदारांच्या संरक्षणासाठी वापरील जात आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे (Jayant Patil On Shinde-Fadnavis Govt)

 

मुख्यमंत्री शिंदे समर्थक आमदारांना व्हाय दर्जाची सुरक्षा देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांपैकी ४७ बलेरो गाड्या व्हिआयपी सुरक्षा विभागाने मागवून घेतल्या. या गाड्यांपैकी १७ गाड्या परत करण्यात आल्या असल्या तरी ३० गाड्या अद्यापही शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरल्या जात आहेत. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमधील वेगवेगळ्या पोलिस स्थानकांना गस्त घालण्यासाठी या बलेरो गाड्या देण्यात आल्या होत्या. काही पोलीस स्टेशनला एक तर काहींना दोन गाड्या देण्यात आलेल्या. मात्र गाड्या देण्यात आल्यानंतर काही दिवसांमध्येच त्या पुन्हा माघारी घेण्यात आल्या, अशी माहिती या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीखाली दिली. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे सरकारवर लक्ष्य केले.

जयंत पाटील यांनी केलेल्या ट्विट मालिकेत ते लिहितात, “निर्भया निधी महिलांची सुरक्षितता आणि महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने तयार केलेला निधी होता.
या निधीतून पोलिसांच्या कामकाजात सुलभता यावी म्हणून वाहने खरेदी केली गेली.
मात्र या निधीतून घेतल्या गेलेल्या वाहनांचा उपयोग फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी केला जात आहे.”
अशा कॅप्शनसहीत जयंत पाटलांनी बातमीची कात्रणे जोडली आहेत.

 

ते पुढे लिहितात, “एकीकडे मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर जनता असल्याचा दावा करतात,
दुसरीकडे ते त्यांच्या प्रत्येक समर्थक आमदार व खासदाराला पाच पोलिसांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा देतात.
जनता त्यांच्याबरोबर असेल तर मग त्यांना नक्की भीती कशाची वाटते आहे?”

 

“निर्भया निधीतून घेतलेली वाहने ही पोलीस स्टेशन्सला त्वरित पाठविण्यात यावीत.
आमदारांच्या सुरक्षिततेपेक्षा राज्यातील जनता व महिला भगिनींची सुरक्षा आम्हाला जास्त महत्वाची वाटते,”
असे त्यांनी शेवटच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

Web Title :- Jayant Patil On Shinde-Fadnavis Govt | suvs brought with nirbhaya fund used to give y plus security to cm shinde legislators ncp slams government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

7th Pay Commission | नवीन वर्षात मोदी सरकार इतका वाढवणार DA, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार मोठी वाढ

CM Eknath Shinde | ‘हा प्रकल्प होऊ नये म्हणून बैठका झाल्या’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

PAN-Aadhaar Linking | इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिला इशारा ! 31 मार्चपर्यंत करा ‘हे’ काम अन्यथा डिअ‍ॅक्टिव्ह होईल पॅनकार्ड