Jayant Patil On Shivsena Dasara Melava | शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते जाणार का? जयंत पाटील यांनी दिले हे उत्तर, म्हणाले…

मुंबई : Jayant Patil On Shivsena Dasara Melava | दसरा मेळाव्याच्या जागेवरून सध्या शिवसेना आणि शिंदे गट, भाजपामध्ये राजकारण सुरू आहे. शिवाजी पार्क किंवा बीकेसीतील मैदान शिवसेनेला देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ सुरू आहे. यामुळे हा मुद्दा सध्या खुपच चर्चेत आहे. आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर वक्तव्य केले आहे. शिवसेनेने राष्ट्रवादीच्या नेत्यांना दसरा मेळाव्याचे आमंत्रण दिले तर जाणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर जयंत पाटील यांनी स्पष्ट उत्तर दिले. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Jayant Patil On Shivsena Dasara Melava)

जयंत पाटील म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून दसरा मेळाव्याची परंपरा आहे. हीच परंपरा उद्धव ठाकरे यांनी पुढे चालवलेली आहे. यापुढेही ही परंपरा चालू राहावी ही महाराष्ट्राची इच्छा आहे. दसरा मेळाव्यासाठी इतर पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिले जात नाही. तो त्यांच्या पक्षाचा मेळावा असतो. त्यांनी याआधी दुसर्‍या पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिलेले आहे, असे माझ्या ऐकीवात नाही.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावर जयंत पाटील म्हणाले, आधीच्या सरकारमुळे हा प्रकल्प गुजरातला गेलेला नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फॉक्सकॉनला एक पत्र लिहिले होते.
दोन दिवसांत आपण एमओयू करू आणि मंत्रीमंडळापुढे हा प्रस्ताव मांडू असे या पत्रात लिहिलेले होते.
सगळे सुरळीत सुरू होते. मात्र अचानक प्रकल्प गेला. यामध्ये राज्य सरकार दोषी आहे.
दुसर्‍या कोणाचाही यामध्ये दोष नाही.

Web Title :- Jayant Patil On Shivsena Dasara Melava | NCP leader jayant patil comment on shiv sena dussehra melava said no other party leaders invited

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ramdas Kadam | मुंबईतील एकूण शौचालयातून जेवढी घाण निघत नाही तेवढी…, शिवसेना नेत्याची रामदास कदमांवर जहरी टीका

MNS Chief Raj Thackeray | ‘होय… माझ्याकडून दुर्लक्ष झालं, पण यापुढे…’, राज ठाकरेंकडून नागपूरची कार्यकारिणी बरखास्त