×
HomeराजकीयJayant Patil on Udayanraje Bhosale | जयंत पाटलांचा जोरदार टोला; म्हणाले -...

Jayant Patil on Udayanraje Bhosale | जयंत पाटलांचा जोरदार टोला; म्हणाले – ‘उदयनराजे संध्याकाळी कोणत्या अवस्थेत बोलले ते तपासले पाहिजे’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil on Udayanraje Bhosale | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक (Silver Oak) या निवासस्थानी संपकरी एसटी कामगारांनी (ST Workers Strike) आंदोलन केले आहे. यावेळी चप्पल, दगडफेकी देखील करण्यात आली. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांत आरोपांच्या फैरी देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, भाजपचे (BJP) राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी शरद पवार यांच्या घरावर जो हल्ला झाला, ‘जे केलंय ते इथंच फेडावं लागेल’ अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Janyat Patil) यांनी पलटवार केला आहे. (Jayant Patil on Udayanraje Bhosale)

 

त्यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ”उदयनराजे भोसले काय बोलतात याला फार महत्त्व देण्याची गरज नाही.
मुळात ते संध्याकाळी बोलले आहेत, ते कोणत्या परिस्थितीत बोलले आहेत, हे तपासले पाहिजे आणि नंतर त्यावर मी बोलेन,” असा टोला पाटील यांनी लगावला आहे. (Jayant Patil on Udayanraje Bhosale)

 

पुढे जंयत पाटील म्हणाले, ”एसटी कर्मचाऱ्यांना गेली 40 वर्ष वेळोवेळी मदत केलीय,
आधार दिला त्यामुळे खरा एसटी कर्मचारी पवार साहेबांच्या घरापर्यंत अशा पद्धतीने जाणार नाही.
हे मुद्दामपणे आणि जाणीवपूर्वक केलेलं काम आहे. जे तिथे आले ते एसटी कर्मचारी होते का, ते कोणत्या परिस्थितीत होते हे सत्य बाहेर येईल,” असं ते म्हणाले.

 

दरम्यान, ”सिल्व्हर ओक बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी दगड फेक करत आंदोलन केले.
त्यानंतर गुणरत्न सदावर्ते (Adv Gunaratna Sadavarte) याना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माझ्या जिविताच काही बरं वाईट झालं तर पोलीस जबाबदार राहतील असं ते म्हणाले यावर पोलिसांकडे काही तरी कारण असतील त्यांना अटक करण्याचे, त्याप्रमाणे कारवाई होईल.
ही असली स्टंटबाजी बंद झाली पाहिजे,” असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :-  Jayant Patil on Udayanraje Bhosale | ncp leader jayant patil slaps udayanraje bhosale on statement on sharad pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Must Read
Related News