अजित पवारांना भेटण्यासाठी जयंत पाटील पोहचले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे बडे नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली. शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे काही आमदार होते. मात्र, ते आमदार दुपारनंतर राष्ट्रवादीच्या वायबी सेंटर येथील बैठकीला उपस्थित राहिले. दरम्यान, आता अजित पवारांसोबत कोणीही नाही, ते एकटेच बाहेर राहू नये म्हणून त्यांचे मन वळविण्यासाठी आपण अजित पवार यांची भेट घेण्यासाठी आलो आहोत असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

रविवारी सकाळी दिलीप वळसे-पाटील यांनी देखील अजित पवारांची भेट घेतली होती. मात्र, अजित पवारांचे मन वळविण्यात त्यांना यश आले नव्हते. पुन्हा एकदा अजित पवारांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे सुप्रीम कोर्टात शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी चालु झाली आहे.

Visit : Policenama.com