Jayant Patil | अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त जयंत पाटलांनी सांगितलं त्यांच्या स्वभावाच गुपित, म्हणाले…

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (NCP state president) आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आज (22 जुलै) रोजी वाढदिवसानिमित्त (Birthday) सर्वत्र प्रकारे कौतुक केले आहे. त्यांच्या लहान असतानाच्या कामगिरीपासून ते आज उपमुख्यमंत्री पदापर्यंत आणि अजितदादांच्या स्वभावाचा अशा साऱ्यांचा एक पडदा जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उलगडून दाखवला आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, ‘अजितदादा आणि माझा गेली 30 हून अधिक वर्षांचा स्नेह आहे.
मी, दिलीपराव वळसे-पाटील, आर.आर.आबा, अजितदादा असे आम्ही सर्व एकाच वेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून आलो आणि त्यामुळेच आम्हाला प्रदीर्घकाळ सोबत काम करता आले. अजितदादांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदातून झाली. सोळा वर्षे अजितदादा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते.
त्या काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठेवी 300 कोटींहून 1 लाख 60 हजार कोटींपर्यंत पोचल्या.
अत्यंत सक्षमपणे..! असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे जयंत पाटील म्हणाले, ‘अजितदादांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक सांभाळलेल्या नेत्यांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी लोकसभेवर जाण्याची संधी दिली आणि ते प्रचंड मताधिक्याने लोकसभेवर निवडून गेले.
बहुधा अजितदादांच्या खमक्या स्वभावाला लोकसभा रुचली नसावी की काय महाराष्ट्राच्या विधिमंडळात परतले. तसेच, सुधाकरराव नाईक यांनी अजितदादांच्या कामांचा झपाटा बघून त्यांची कृषी आणि उर्जाखात्याचे राज्यमंत्री म्हणून निवड केली.
त्यानंतर शरद पवार यांच्या मंत्रिमंडळातही अजितदादांनी उत्तम कामगिरी बजावली. 1995 ते 1999 या काळात आम्ही सर्वजण विरोधी पक्षात होतो.
त्यावेळी मी, दादा, आबा, दिलीपराव असे एकत्र विधानसभेत बसायचो.
पत्रकारांनी त्यावेळी आम्ही सभागृहात बसायचो त्या जागेला ‘अशांत टापू’ असे नाव दिले होते. असं पाटील म्हणाले.

‘1995 ते 1999 याकाळात आम्ही विरोधी पक्षात असताना आम्ही सरकारच्या चुकीच्या धोरणांवर अक्षरश: तुटून पडत असू. 1999 साली आम्ही एकाच वेळी कॅबिनेट मंत्री झालो.
माझ्याकडे पक्षाने अर्थखात्याची जबाबदारी दिली. अजितदादा यांच्याकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी होती.
पुढे पंधरा वर्षे सत्तेत असताना जी-जी खाती अजितदादांना मिळाली त्यात त्यांनी अत्यंत समरस होऊन काम केले.
मंत्रिमंडळ बैठकीत दादा अत्यंत हिरिरीने जनतेच्या भूमिका मांडत.
पुढे अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतही त्यांनी झोकून देऊन काम केलेत.

पुढे बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, ‘सकाळी 7 वाजल्यापासून कामाला लागणे आणि कामांत शिस्त पाळणे ही अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्य आहेत.
अनेकदा वरवर जरी ते कडक स्वभावाचे वाटत असले तरी आतून ते मृदू आणि हळव्या स्वभावाचे आहेत. अजितदादांनी साठी पार केली, यावर विश्वासच बसत नाही, इतके ते तरुण आणि उत्साही वाटतात.
तसेच, अजितदादा यांच्यासारख्या लोकनेत्याचे कर्तृत्व प्रकाशझोतात आणण्यासाठी सकाळ समूह अजितदादांवर ग्रंथ प्रकाशित करीत आहे.
ही आनंददायी बाब आहे. जीवनातील कोणत्याही आव्हानांना तोंड देण्याची अजितदादांमध्ये क्षमता आहे.
ही क्षमता अशीच कायम राहावी याच अजितदादांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..! अशाच सुदृढ जीवनाची शंभरी अजितदादांनी गाठावी हीच इच्छा.
अशा शब्दात मंत्री जयंत पाटील यांनी अजितदादांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title : jayant patil shares secrets of the deputy chief minister ajit pawars nature

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Khadakwasla Dam | खडकवासला धरणातून विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Thackeray Government Big Decision | पुढील 3 दिवस धोक्याचे, कोकणातील पुरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Jalyukt Shivar | ‘जलयुक्त शिवार योजना ही झोलयुक्त शिवार योजनाच होती’