‘तुम्ही मातोश्री बाहेर कॅमेरे लावले होते का’ ? जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना ‘सवाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील मंत्रीपदाच्या वाटपावर बोलताना म्हणाले होते, की राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रीपद दिल्यास ‘मातोश्री’ बाहेर कॅमेरे लागतील. अशी टीका केली होती. त्यावर राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व गृहमंत्री असताना त्यांनी मातोश्रीबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते का. हे चंद्रकांत पाटील यांना नक्कीच माहिती असेल आणि त्याच कल्पनेतून त्यांनी हे विधान केले असावे.’

वरील प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी कोथरूड मध्ये साहित्यिक कलावंत संमेलनाच्या उदघाटन पूर्वी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यानंतर ते म्हणाले की, ‘गेली पंचवीस वर्षे भाजपने उद्धव ठाकरे यांची फसवणूक केली, शिवसेनेला दुय्यम दर्जाची वागणूक दिली, लहान भाऊ म्हणून वागवले. त्यामुळेच सेना युतीतून बाहेर पडली. शिवसेनेचा काँग्रेस- राष्ट्रवादी सोबतचा अनुभव चांगला असेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/