Jayant Patil | ‘शिंदे गटात गेलेले तात्पुरते, शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत…’, जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) आल्यानंतर शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गृहपक्षांना राजीनामा देऊन अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहे. यावरुन राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मिश्किल टिप्पणी केली.

 

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, शिंदे गटात (Shinde Group) गेलेले काही लोक आताच मला भेटले. त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. शिंदे गटात गेलेले आहेत ते तात्पुरते गेले आहेत. शिंदेची सत्ता आहे, शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आहेत तोपर्यंत सोयी सवलती मिळत असल्याने लोक तिथे जात आहेत. त्यामुळे तिकडे गेलेल्या लोकांना आम्ही काही बोलवत नाही. एका कार्यकर्त्याने सांगितले की सहा महिने जातो, निधी आणतो आणि परत येतो. महत्त्वाच्या कार्यकर्त्याने अशी परवानगी मागितली. नगरपालिकेत निधी येणं गरजेचं आहे. मी जाऊन या म्हटलं, असं म्हणत ते मिश्किल हसले. तसेच शिंदे गट कधीही भाजपवासी (BJP) होतील असंही जयंत पाटील म्हणाले.

 

नामकरणाला विरोध नाही

अहमदनगरला अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांचं नाव देण्याचं समर्थनच केलं पाहिजे. याला विरोध करणं आम्ही योग्य समजत नाही. चौंडीला अहिल्यादेवी होळकरांचे वास्तव्य होतं. आम्ही संपूर्ण गावाच्या सुधारणांसह निधी देण्याच काम सुरु केलं होतं. ते गाव विकसित झालं आहे. चौंडीला अहिल्यादेवी होळकरांचं स्थान असल्याने त्या जिल्ह्याला महत्त्व आहे, असंही जयंत पाटील म्हणाल.

 

खेळाडूंचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न

Advt.

दिल्लीतील ज्या मुलींनी जगात मेडल्स मिळवले, जागतिक दर्जाच्या खेळामध्ये प्राविण्य मिळवले.
त्यांना रस्त्यावर पडाणं, त्यांच्या तोंडावर पाय ठेवणं, याप्रकरणी संपूर्ण देश निषेध करतोय.
एका बाजूला तुम्ही संसदेचं उद्घाटन करताय तर दुसऱ्या बाजूला तुम्ही खेळाडूंच आंदोलन
चिरडण्याचा प्रयत्न करताय का तर त्या दिवशी संपूर्ण मीडियामध्ये संसदेच्या उद्घाटन सुरु आहे.
त्यामुळे या आंदोलकांना (Wrestlers Protest) तिथून हटवलं तर मीडिया कव्हर करणार नाही.
खेळाडू आणि संपूर्ण देश त्यांच्यामागे उभा राहिला.
भाजपने त्या कार्यक्रमाला गालबोट लावून घेतलं, असंही जयंत पाटील म्हणाले.

 

Web Title :  Jayant Patil | ‘Temporary who went to Shinde group, until Shinde is Chief Minister…’, Jayant Patal’s difficult comment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा