Jayant Patil | ‘…तर ‘तो’ आमदार विधानसभेत परत कधी दिसणार नाही, भाजपने बुडाखाली काय जळतंय ते पहावं’ – जयंत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil | ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्षातील भाजपच्या नेत्यांनी हे सरकार पडणार असल्याचा दावा केला आहे. मात्र सरकार अद्यापही स्थिर आहे. अशातच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी, सरकारमधील 25 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 50 आमदार संपर्कात असल्याचा प्रतिदावा केला होता. याच पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दानवेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

आमचे आमदार फुटणे शक्य नाही, जर फुटला तर तो परत विधानसभेत (Assembly) दिसणार नाही. लोकच त्याला सळो की पळो करून सोडतील. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प (Budget) सादर केला त्यावेळी भाजपच्या आमदारांना जास्त निधी दिला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) जितका निधी (Fund) दिला नाही त्याच्यापेक्षा जास्त निधी आम्ही दिल्याचं भाजपचे आमदार फोन करून सांगत आहेत त्यामुळे आमदार फुटणे शक्य नाही, असं जयंत पाटील यांनी (Jayant Patil) म्हटलं आहे.

 

आमदार फुटला तर त्याला परत विधानसभेत येणं कठीण आहे. तिन्ही पक्ष एकत्र आले तर त्या आमदारालाही निवडून येणं शक्य नाही.
भाजपने (BJP) आपल्या बुडाखाली काय जळतंय ते पहावं.
भाजपला पंचाईत आहे की त्यांचे आमदार त्यांच्यासोबत राहतील की नाही याची त्यांनाच शाश्वती नाही.
ती पंचाईत होऊ नये म्हणून यंत्रणांची भीती दाखवण्याचं काम सुरू असल्याचं म्हणत पाटलांनी भाजपवर निशाणा साधला.

 

Web Title :- Jayant Patil | Thackeray government minister and ncp leader jayant patils clear warning after bjp raosaheb danve statement on mla

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BMC Vs Narayan Rane | नारायण राणेंच्या बंगल्यावर हातोडा पडणार ?; महापालिकेची राणेंना दुसरी नोटीस !

 

Folic Acid Benefits | पुरुषांमध्ये ‘ही’ एक महत्वाची गोष्ट वाढवते फॉलिक अ‍ॅसिड, जाणून घ्या याचे 5 मोठे फायदे आणि स्त्रोत

 

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेची मुख्य सभा आणि स्थायी समितीसह विषय समित्यांचेही कामकाज होणार; पण…