Jayant Patil | ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का ? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील राजकीय बंडानंतर आता 30 जुलै रोजी बहुमत चाचणी (Majority Test) होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) कॅबिनेटमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामकरणास मंजुरी देण्यात आली. या बैठकीनंतर (Maharashtra Cabinet Meeting) माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बैठकित झालेल्या चर्चेची माहिती दिली. यावेळी ही तुमच्या सरकारची शेवटची कॅबिनेट होती का ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, थांबा आणि पाहा… असे उत्तर दिले.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानंतर उद्या बहुमत चाचणी होणार का नाही हे समजेल. त्यानंतरच, काय असेल ते समजेल, असे म्हणत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारच्या भवितव्याबद्दल भाष्य केलं. तसेच, मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांचे आभार मानले. तसेच गेल्या अडीच वर्षात चांगलं काम केल्याबद्दल अभिनंदनही केलं. नामांतराचे तीन प्रस्ताव झाले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

यावेळी त्यांनी ज्या खात्यांचे विषय राहिलेले आहेत, ते पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेऊ, असे आश्वासन दिले.
तसेच मला माझ्या लोकांनी दगा दिला, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. जर माझ्याकडून कोणाचा अपमान झाला किंवा दुखावले असतील तर मी माफी मागतो,
अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सर्वांचे आभार मानले.

 

Web Title :- Jayant Patil | was this your last cabinet ncp leader and minister jayant patil spoke clearly on the question of the journalist

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा