Jayant Patil | जयंत पाटलांचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘…म्हणून सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदाची संधी आम्ही सोडून दिली’

पुणे / तळेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या पक्षाकडे मुख्यमंत्री (CM) करण्याची संधी होती. पण, एकत्रीत काम करायचं असल्याने आपण ती सोडली, असा गौप्यस्फोट जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तळेगाव (Talegaon) येथील सभेत बोलताना केला. पण, 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये (2024 Assembly Election) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) हा महाराष्ट्रात नंबर एक पक्ष बनवायचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आमदारांना निवडून आणायचं असून ती भेट शरद पवारांना (Sharad Pawar) द्यायची आहे, असे आवाहन जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कार्यकर्त्यांना केले.

 

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, एकदा 72 आमदारांच्या (MLA) संख्येवर पोहचलो. महाराष्ट्रात मुख्यमंत्री करण्याची संधी आमच्या पक्षाकडे आली. आघाडीत एकत्रित काम करुयात, सर्वांना बरोबर घेऊयात म्हणून ती संधी आम्ही सोडून दिली. पण राज्यात 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सर्व जागा निवडून आणण्याची जिद्द बाळगली पाहिजे. शरद पवार यांनी पक्षासाठी उभं आयुष्य वेचले. आजही ते 24 तास काम करतात. हे पाहता त्यांना 2024 च्या विधानसभेत सगळ्यात मोठी भेट म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष म्हणून जास्तीत जास्त आमदार निवडून आणणायचे आहेत. असे जयंत पाटील म्हणाले.

मलिकांना 15 मिनिटं दिली असती तर…
ईडीने (ED) नवाब मलिक (Nawab Malik) यांना 15 मिनिटं दिली असती तर सर्व कागदपत्रे दिली असती.
पण या प्रकरणात NIA आली पाहिजे असे प्रयत्न सुरु आहेत. कारण मलिक यांनी नार्कोटिकच्या (Narcotic) विरोधात जी भूमिका घेतली.
त्यातून महाराष्ट्रातील आणि देशातील काही-लोकांचं पितळ उघडं पडलं आहे. हा माणूस आमच्या सरकारच्या विरोधात बोलतोय.
त्याला अडचणीत आणले पाहिजे. याच भूमिकेतून ही कारवाई सुरु असल्याचे पाटील म्हणाले.
तसेच हे प्रकरण दाऊद (Dawood Ibrahim) आणि दहशतवादी संघटनेपर्यंत (Terrorist Organization)
पोहचून आपल्या सरकारमधील या मंत्र्याला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु आहे. शरद पवारांबाबत देखील हेच केलं. मात्र काहीच निघालं नाही.

 

Web Title :- Jayant Patil | while forming government we gave up the opportunity of the chief minister post says jayant patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | ‘झुकेंगे नही, लढेंगे और जीतेंगे भी’, जयंत पाटलांचा भाजपला टोला

 

Blood Sugar Weakness | डायबिटीजमध्ये अशक्तपणा आल्यास ‘या’ 5 गोष्टींचा जेवणात करा समावेश, ब्लड शुगरसुद्धा राहील कंट्रोल !

 

Salman Khan Wedding Rumors News | अभिनेता सलमान खाननं सोनाक्षीसोबत उरकलं गुपचूप लग्न? सोशल मीडियावर व्हायरल फोटोने घातला धुमाकूळ