Jayant Patil | निवडणुकांवरुन जयंत पाटलांचा सरकारला टोला, म्हणाले-‘आपलं रामराज्य आलं, निवडणुका घ्यायला राम…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सध्या सुरु आहे. विरोधक विविध मुद्यांवरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) कधी होणार याची माहिती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही. निवडणुकीवरुन माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सवाल उपस्थित केला. जेव्हापासून आपलं रामराज्य आलं आहे तेव्हापासून निवडणुका घ्यायला राम का घाबरला आहे हे काही कळत नाही. आपण धाडसाने निवडणुका घेतल्या पाहिजेत, असे म्हणत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारला टोला लगावला.

राज्यातील 25 जिल्हा परिषदा, 14 महापालिका आणि 284 पंचायत समित्यांसह नगरपालिका, नगरपंचायतींवरील प्रशासकांना 15 ते 20 मार्चच्या दरम्यान वर्षपूर्ती होईल. अद्याप राज्यात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही. यावरुन विधानसभेत बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

जयंत पाटील म्हणाले, 24 एप्रिल 1993 रोजी घटनादुरुस्ती (Constitutional Amendment) होऊन ती अंमलात आणली गेली. त्यानंतर आपल्या देशात लोकसभा आणि विधानसभेला घटनात्मक संरक्षण मिळालं. तसेच पंचायत राजलाही घटनेचे संरक्षण मिळालं. त्यामुळे यात आता पूर्वीप्रमाणे हस्तक्षेप किंवा मनमानी करता येत नाही. निवडणुका घेणे किंवा त्यांना अधिकार देणे या गोष्टी आता पूर्वीप्रमाणे राज्य सरकारच्या मर्जीवर अवलंबून राहिलेल्या नाहीत.

जयंत पाटील पुढे म्हणाले. पूर्वी आपल्या सोयीचं वातावरण नसेल तर निवडणुका पुढे ढकलल्या जायच्या.
परंतु पाच वर्षांनी का होईना निवडणुका व्हायच्या. कोरोना काळात आपण निवडणुका घेऊ शकलो नाही.
तेव्हाची परिस्थिती बिकट होता. परंतु मागच्या वर्षभरात, जेव्हापासून आपलं रामराज्य आलं आहे
तेव्हापासून निवडणुका घ्यायला राम का घाबरला आहे हे काही कळत नाही.
आपण धाडसाने निवडणुका घेतल्या पाहिजेत, असे म्हणत जयंत पाटलांनी राज्य सरकारला टोला लगावला.

Web Title :- Jayant Patil | why government afraid to hold local body elections jayant patil asked

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी चिंचवडमध्ये झळकले कुख्यात गुन्हेगार नीलेश घायवळच्या वाढदिवसाचे बॅनर्स, प्रचंड खळबळ

CCTV In Police Stations | राज्यातील 1 हजार 82 पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत – देवेंद्र फडणवीस

Maharashtra Farmer News | शेतकर्‍याची यशोगाथा ! मेहनत, जिद्द आणि शासनाची साथ; खडकाळ माळरानावर फुललेल्या फळबागेचा शेतकऱ्याला हात