राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा दणदणीत विजय, इस्लामपूरात शिवसेना भूईसपाट

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी अपक्ष उमेदवार निशीकांत भोसले पाटील यांचा दारुण पराभव केला. इस्लामपूर (सांगली) मतदारसंघातून जयंत पाटलांचा विजय मोठा मानला जात आहे. कारण जयंत पाटलांनी 72,169 मतांनी आपला विजय निश्चित केला. राष्ट्रवादीची मोठी ताकद जयंत पाटलांच्या मागे उभी करण्यात आली होती. तर शिवसेनेच्या गौरव नायकवाडी यांना तर फक्त 35,668 मते मिळाली. त्यामुळे जयंत पाटलांनी शिवसेनेला उचलच खाऊच दिली नाही.

या मतदारसंघात यंदाच्या विधानसभेला मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. या निवडणूक जयंत पाटलांना एकूण 1,15,563 मते मिळाली तर निशीकांत भोसले पाटील यांना 43,394 मते मिळून दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी 1 लाख 13 हजार 045 एवढी मते घेत विजय मिळवला. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर अपक्षचे अभिजीत पाटील होते. त्यांना 37 हजार 859 मते मिळाली आणि त्यांचा 75 हजार 186 मतांनी पराभव झाला. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर काँग्रेसचे जितेंद्र पाटील, चौथ्या स्थानावर अपक्षचे बीजी पाटील आणि पाचव्या क्रमांकावर मनसे चे उदयसिंह पाटील होते.

1. जयंत राजाराम पाटील (राष्ट्रवादी) – 115563 मते (विजयी उमेदवार)
2. गौरव किरण नायकवडी (शिवसेना) – 35668 मते
3. प्रा.विशाल रघुनाथ जाधव (बहुजन समाज पार्टी) – 610 मते
4. बी.जी.काका पाटील (बलीराजा पार्टी) – 556 मते
5. शाकीर इसालाल तांबोळी (वंचित बहुजन आघाडी) – 2295 मते
6. गावडे दत्‍तु भाऊ (अपक्ष) – 285 मते
7. निशिकांत प्रकाश भोसले – पाटील (दादा) (अपक्ष) – 43394 मते
8. विश्‍वासराव गुंडा घस्‍ते (अपक्ष) – 448 मते
9. NOTA – 1196 मते

Visit : Policenama.com