प्रताप सरनाईक यांच्यावरील ED च्या कारवाईवर जयंत पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   ईडीकडून ( ED) शिवसेना ( Shivsena) नेते व आमदार प्रताप सरनाईक( Pratap Sarnaik) यांच्या घरावर व कार्यालयांवर छापा मारण्यात आला. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाले आहे. यामुळे महाविकास आघाडीतील
(Mahavikas Aaghadi) नेते व विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये ( BJP) जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. याच पार्श्ववभूमीवर राष्ट्रवादीचे ( NCP) प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील ( Jayant Patil) यांनी ईडीकडून शिवसेना नेते व आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यावर प्रतिक्रिया देताना भाजपवर घणाघाती टीका केली.

पिंपरी-चिंचवड येथे पुणे पदवीधरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारानिमित्त जयंत पाटील आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते संजोग वाघेरे, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, पार्थ पवार आदी उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, ईडीने जरी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयावर छापे टाकले असले तरी यातून काही हाती लागेल असे मला वाटत नाही. पण जर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना अशाप्रकारे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर यातून आमच्या तीन पक्षांची एकजूट अजून बळकट होणार आहे, असेसुद्धा जयंत पाटील म्हणाले.

पण विरोधी पक्षाच्या राजकीय नेत्यांना त्रास देण्याची भाजपची ही जुनी परंपराच आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. सध्या भाजपचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते पदवीधर निवडणुकीत मनापासून काम करताना दिसत नाहीत. तसेच शिवसेनेसारखा पक्ष या निवडणुकीत आपल्यासोबत आहे. त्याचा फटका भाजपला नक्कीच बसणार आहे. एकंदर याचा फायदा महाविकास आघडीला होणार आहे तसेच त्यांच्या उमेदवारांकडे प्रचारात मांडण्यासारखे कोणतेच मुद्दे नाहीत. भाजपने या निवडणुकीत अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले आहे. त्यामुळे याचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणात बसणार आहे.