Jayashree Gajanan Marne | गजानन मारणेच्या पत्नी आणि माजी नगरसेविका जयश्री मारणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Jayashree Gajanan Marne | पुणे महापालिका निवडणूक Pune Municipal Corporation Elections (PMC Elections) काही महिन्यांवर आली असताना पक्षांतर करण्याचे वारे वाहू लागले आहे. सत्तेची आगामी गणिते लक्षात घेऊन इच्छूक उमेदवारांनी पक्षांतर सुरु केले आहे. सर्वाधिक इनकमिंग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुरू असून आज मनसेच्या (MNS) माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे (Jayashree Gajanan Marne) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये (Pune NCP) जाहीर प्रवेश केला.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष या नात्याने प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे स्वागत केले. यावेळी माजी उपमहापौर दीपक मानकर (Former Deputy Mayor Deepak Mankar), नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक बंडूभाऊ केमसे, नगरसेवक सुभाष जगताप, रुपाली ठोंबरे व अभय मांढरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Jayashree Gajanan Marne)

 

 

शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar) व सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विचारांवर निष्ठा दाखवून जायश्री मारणे
या राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात दाखल झाल्या आहेत. येत्या काळात शहरातील अनेक मातब्बर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दिसतील,
असे सूचक विधान शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.

 

 

Web Title :- Jayashree Gajanan Marne | Jayashree Marane, wife of notorious goon Gajanan Marane and former corporator Jayashree Marane joins NCP

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम ! दररोज 167 रुपयाची करा गुंतवणूक अन् मिळवा 41 लाख, जाणून घ्या

 

Dombivli Crime | धक्कादायक ! घरातील सोफासेटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, परिसरात प्रचंड खळबळ

 

Narayan Rane On Sanjay Raut | ‘संजय राऊतांचा मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवर डोळा, राष्ट्रवादीकडून सुपारी’ – नारायण राणे (व्हिडीओ)