संविधान बदलणे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही ; स्मृती इराणींवर ‘या’ नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे प्रचारासाठी सर्व जोरदार तयारीला लागले आहेत. प्रचारादरम्यान त्यांची जोरदार हा नेहमी चर्चेचा आणि वादाचा मुद्दा ठरत असतो. तसंच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. स्मृती इराणी संविधान बदलण्याची भाषा करतात, मात्र संविधान बदलणे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही, असं वक्तव्य जयदीप कवाडे यांनी केलं आहे. त्यामुळे नवीन वाद सुरु होऊ शकतो.

नागपूरमधील बगडगंज भागात काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांची प्रचारसभा झाली. या सभेत जयदीप यांनी भाषणादरम्यान स्मृती इराणींवर टीका करताना आपली पातळी सोडली. स्मृती इराणी संविधान बदलण्याच भाषा करतात, मात्र संविधान बदलणे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी आपल्या भाषणात केले. इतर अनेक मान्यवर त्याठिकाणी उपस्थित होते.

दरम्यान, जयदीप यांचे भाषण संपल्यानंतर नाना पटोले यांनी जयदीप यांनी बाजूला बसवून शाबासकीही दिली. मात्र जयदीप यांच्या या आक्षेपार्ह भाषणानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. निवडणुका आल्या की टीका होतच असतात. एकमेकांवर आरोप करणं हे होतंच. मात्र टीका करताना सर्वच नेत्यांनी आपल्या टीका करण्यावर मर्यादा ठेवल्या पाहिजेत. कारण काही अक्षेपार्ह टीकांनी वाद निर्माण होण्याच्या शक्यता आसतात.

Loading...
You might also like