शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागरांचा अजित पवारांना इशारा ; म्हणाले, ‘मला ‘ती’ माहिती उघड करायला लावू नका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी दिसून आली आहे. मंत्रिमंडळात नव्याने केलेल्या विस्तारावरून विरोधकांनी टीका केली. तसंच पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यावर एकेकाळी राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक परंतून शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी लगेच क्षीरसागर यांना मंत्रीपदही दिले आहे. अजित पवार यांनी या विस्तारावर आक्षेप घेत त्यावर टीका केली. शेतकरी प्रश्न आणि कथित अर्थसंकल्प फुटीवरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. आम्हाला वाटलं होतं कोल्हापूरचे क्षीरसागर मंत्री होतील, पण झाले बीडचे. निष्ठावंत शिवसैनिकांनी काय सतरंजा उचलायच्या काय ?’ असा खोचक सवाल अजित पवारांनी केला होता. अजित पवारांच्या या टीकेवर आक्रमक होत जयदत्त क्षीरसागर यांनी उत्तर दिलं आहे.

अजितदादा तुम्हीच मला रेटत-रेटत इथपर्यंत आणलं. मी आधी तुमच्यासोबतच होतो, त्यामुळे मला सगळं माहिती आहे. ते उघडं करायला लावू नका, असा इशारा क्षीरसागर यांनी अजित पवारांना दिला आहे. क्षीरसागर यांच्या या इशाऱ्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

तर दुसरीकडे, विधानपरिषेदत मुख्यमंत्री आणि अनिल परब आमने सामने आले. तेव्हा अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत आरोप केले. कल्याण डोंबिवलीतील कर बुडव्यांवर आणि त्यांना वाचवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. करबुडव्यांना पाठीशी घातलं जातं आणि अधिकारी त्यांच्याकडून पैसे उकळतात अशा अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली जाते, असं अनिल परब यांनी म्हटलं. तर त्यावर मुख्यमंत्र्यांनी, याबाबत पुन्हा एकदा तपास करू, सविस्तर चौकशी करु, असं सांगितलं.

आरोग्यविषयक वृत्त –
तेजस्वी डोळ्यांसाठी गुणकारी औषधी वनस्पतींचा वापर

दुधी भोपळ्याची भाजी खाल्ल्यास दूर पळतील अनेक आजार

प्राचीन ग्रंथांमध्ये सूखी वैवाहिक जीवनासाठी सेक्ससंबंधी शास्त्रीय माहिती