पुणे जिल्हा भाजपच्या कामगार आघाडी अध्यक्ष पदी जयेश शिंदे

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्हा भाजप नुतन कार्यकारिणी नुकतीच जाहिर करण्यात आली. या नवीन कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम नुकताच पुण्यातील बावधन येथील सूर्य दत्त इन्स्टिट्यूट मध्ये पार पडला. यावेळी पुणे जिल्हा भाजपच्या कामगार आघाडी अध्यक्ष पदी शिरूर तालुक्यातील युवा उद्योजक जयेश शिंदे यांची निवड करण्यात आली असून त्याच्या नियुक्तीचे पत्र खासदार गिरीष बापट यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

भाजपच्या माध्यमातून जयेश शिंदे हे गेल्या दहा वर्षांपासून सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकारण आणि समाजकार्यात सक्रिय आहेत, शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र विठ्ठलवाडी या गावच्या उपसरपंच पदी धुरा देखील त्यांनी संभाळली आहे. संघ विचारसरणी आत्मसात करून ते गेल्या अनेक वर्षांपासून संघात स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत. शिरूर तालुक्यात भाजपच्या सदस्य वाढीसाठी भरीव अशी कामगिरी करत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या माध्यमातून शिरूर हवेली मतदार संघात भाजपचे विचार रुजवून अनेक युवकांचे संघटन शिंदे यांनी केले आहे.

निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचीत कामगार आघाडी अध्यक्ष जयेश शिंदे यांनी सांगितले की माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाने जिल्ह्याच्या कामगार आघाडीच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे या संधीचे सोने करत पुढील काळात जिल्ह्यातील कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असून स्थानिकांना रोजगार मिळून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे.

यावेळी खासदार गिरीष बापट, आमदार राहुल कुल, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भीमराव तापकीर, शरद ढमाले, योगेश गोगावले, रवी अनासपुरे,गणेश भेगडे, जालिंदर कामठे, अमोल बालवडकर, कांचन कुल, दादा सातव, सुदर्शन चौधरी,संदिप सातव आदी मान्यवर उपस्थित होते.