Jaykumar Gore Accident | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील मानव खटाव मतदार संघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore Accident) यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. फलटण या ठिकाणी त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात गोरे गंभीर जखमी झाले आहेत. बानगंगा नदीच्या पुलावरून गोरेंची गाडी 50 फूट खोल दरीत कोसळली. नदीच्या पुलावरील संरक्षक तारा तोडत त्यांची भरधाव गाडी दरीत कोसळली. गोरेंवर (Jaykumar Gore Accident) पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
— Jaykumar Gore (@Jaykumar_Gore) December 24, 2022
आमदार गोरे (Jaykumar Gore Accident) मुंबईहून आपल्या घरी साताऱ्याला निघाले होते. त्यावेळी फलटणजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्यासमवेत गाडीत असलेले इतर तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ बचाव कार्य सुरू झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमदारांसह इतर तिघांवरही पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जयकुमार गोरे आणि इतर तिघांची प्रकृती स्थिर आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार,
साताऱ्यातील फलटणजवळ गोरे यांच्या गाडीचा ताबा सुटला आणि भीषण अपघात (Accident News) झाला.
हा अपघात पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, बचावकार्य सुरू केले.
आणि गाडीतून चौघांना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.
Web Title :- Jaykumar Gore Accident | bjp mla jayakumar gore car accident car fell from river bridge into 50 feet deep gorge
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Filmfare Awards | शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त
Amruta Khanvilkar | अभिनेत्री अमृता खानविलकरच्या क्लासिक लुकने इंस्टाग्रामवर लावली ‘आग