Jaysinghrao Pawar | ‘बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील टीकेवर मी आजही ठाम’ – डॉ. जयसिंगराव पवार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Jaysinghrao Pawar | राज ठाकरे यांनी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांची बुधवारी (दि. 30 नोव्हेंबर) भेट घेतली होती. या भेटीवरून अनेक तर्क-वितर्क रंगले होते. या भेटीवेळी काय घडले आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासावर पवार यांचे मत काय यावरून त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Jaysinghrao Pawar)

डॉ. जयसिंगराव पवार यांनी पत्र लिहून या भेटीचा खुलासा केला आहे. पवार लिहितात, राज ठाकरे यांनी त्यांच्या नियोजित कोल्हापूर दौऱ्याच्यावेळी माझी भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मी त्यांना भेट दिली. ते माझ्या निवासस्थानी आले. तेव्हा इतिहासातील विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी प्रत्यक्ष इतिहास आणि त्याचा चित्रपटातून होणारा विपर्यास यावर चर्चा झाली. मी प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याला उजाळा देऊन आजच्या काळाच्या संदर्भात त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. प्रबोधनकारांचे विचार घेऊन मुख्यमंत्री म्हणून सत्तेत आल्यावर आपण महाराष्ट्रात धडाकेबाज काम कराल त्याचे मी स्वागत करेन, असे मी म्हणालो. माध्यमांमध्ये या विधानाची अतिशयोक्ती झाली. यावेळी त्यांच्यासोबत बाबासाहेब पुरंदरेंवर काहीही चर्चा झाली नाही. (Jaysinghrao Pawar)

 

 

राज ठाकरे निघून गेल्यावर मला पत्रकारांनी पुरंदरे-बहुल प्रश्न विचारल्यावर मी त्यांचा इतिहासकार म्हणून गौरवीकरण करणारे विधान केलेले नाही. कारण, आतापर्यंत लिखाणातून आणि संशोधनातून पुरंदरे यांच्या विकृत आणि अनैतिहासिक मांडणीवर अभ्यासपूर्ण टीका केलेली आहे, आणि त्यावर आजही ठाम आहे. या संदर्भात वृत्तपत्रांत प्रसिद्ध बातम्यांमुळे माझ्या वैचारिक भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. म्हणून मी हा खुलासा देत आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टरांचे पत्र ट्विट केले आहे.

Web Title :- Jaysinghrao Pawar ‘I still stand by the criticism of Babasaheb Purandare’ – Dr. Jaisingrao Pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | विवाहेच्छुक महिलेची 12 लाखांची फसवणूक; चिखली परिसरातील घटना

Udayanraje Bhosale | उदयनराजे भाजप सोडणार? उद्या निर्णय घेणार