JCB ड्रायव्हरच्या तळपायाची ‘आग’ मस्तकी, उडवली थेट पोलिसांचीच गाडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका जेसीबी चालकाने दारूच्या नशेत धुमाकूळ घातला असून पोलिसांच्या गाडीचा जेसीबीच्या धडकेने अक्षरशः चक्काचूर केला. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला जीव वाचवण्यात यश मिळवले आहे.

JCB ड्राइवर के सिर पर सवार हुआ खून, कुचल दी पुलिस की गाड़ी

मिळालेल्या माहितीनुसार, हा जेसीबीचालक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आला होता. यावेळी त्याचा पंपावरील कर्मचाऱ्यांबरोबर वाद झाला. त्यावेळी त्याने पेट्रोल पंप तोडण्याची धमकी दिली. त्यानंतर पेट्रोल पंप चालकांने पोलिसांना पाचारण केले असता त्याचा पारा चढला. त्याने पोलसांच्या गाडीलाच जोरदार धडक देत गाडीचा अक्षरशः भुगा केला. यावेळी पोलिसांनी कसेबसे स्वतःचे प्राण वाचवत या जेसीबी चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामध्ये स्पष्टपणे सर्व घटना दिसून येत आहे.

JCB ड्राइवर के सिर पर सवार हुआ खून, कुचल दी पुलिस की गाड़ी

दरम्यान, पोलिसांनी या जेसीबी चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे आणि पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like