home page top 1

NDAतील JDUचा ‘ट्रिपल तलाक’ विधेयकाला विरोध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एनडीएतील सहभागी पक्ष जनता दल यूनायटेड (जेडीयू) ने नव्या ट्रिपल तलाकच्या बिलाला विरोध केला आहे. जेडीयूचे नेता केसी त्यागी यांनी सांगितले की ट्रिपल तलाकच्या बिलातील कायदे मंजूर नसून आपला त्या बिलाला पाठिंबा नाही आणि आपण त्या बिलाला विरोध देखील करणार आहेत. जेडीयू भाजपवर नाराज असल्याचे समोर आले होते, मात्र नितीश कुमार यांनी ती चर्चा खोडून काढली होती, मात्र आता पुन्हा एकदा जेडीयू आणि भाजपात या मुद्दयावर नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.

ट्रिपल तलाकला समर्थन देणार नाही –
जेडीयूचे नेता केसी त्यागी यांनी सांगितले की, आम्ही आमचे म्हणणे लॉ कमीशन समोर मांडले होते की या बिलावर सर्व पक्षाची चर्चा व्हावी, त्यागी यांनीसांगितले की आम्ही या आधी देखील ट्रिपल तलाकला संसदेत विरोध केला होता आणि आता देखील आमची यी बिलाला सहमती नाही. जेडीयू ट्रिपल तलाक या मुद्दयावरुन राज्यसभेत भाजपला किंवा एनडीएला समर्थन देणार नाही.

ट्रिपल तलाक एक सामाजिक मुद्दा –
जेडीयूचे त्यागी यांनी सांगितले की ट्रिपल तलाक हा सामाजिक मुद्दा आहे. ट्रिपल तलाकच्या मुद्याला सामाजिक स्तरावर समाजाकडून सोडवण्यात आला पाहिजे. जेडीयूने राज्यसभेत मागील वेळी ट्रिपल तलाकच्या विरोधात वोट केले होते. सरकार ट्रिपल तलाक या प्रथेच्या विरोधात एक विधेयक आणणार आहे.

ज्याद्वारे ट्रिपल तलाकला एक गुन्हा म्हणून समोर येईल. ज्या अंतर्गत 3 वर्षाचा तुरूंगवास आणि दंड भरावा लागेल. केंद्रीय मंत्रिमंडळाने आताच मुस्लिम महिला विधेयक (विवाह अधिकार संरक्षण) 2019 मध्ये मंजूर केले आहे. या बिलाला संसदेच्या पुढील सत्रात मांडण्यात येईल.

सिने जगत –

वाढदिवशीच दिशा पाटनीच्या घरी आला ‘नवा पाहुणा’

सिंहाच्या तोंडावर ‘केक’ लावल्यामुळे भडकली रविना टंडन

‘या’ अभिनेत्याचा ‘फेक’ फोटो सोशलवर शेअर केल्याने 2 महिलांसह 5 जणांविरूध्द तक्रार दाखल

दिशा पाटनीच्या बर्थ डे पार्टीत ‘तशा’ अवतारात आला टायगर श्रॉफ ; फोटो व्हायरल

Loading...
You might also like