काय सांगता ! होय, संतापलेली पत्नी पिस्तुल घेऊन चक्क बारमध्ये शिरली अन् पतीसोबत बसलेल्या तरूणीवर गोळी झाडली

पोलीसनामा ऑनलाईनः पत्नीने बारमध्ये आपल्या पतीसोबत बसलेल्या एका तरूणीवर गोळी झाडून तिची हत्या केली. ब्राझीलच्या तिआंगुआमध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली आहे. या प्रकरणी महिलेला अटक केली आहे.

डजेने बतिस्ता बॅरोला (वय 26) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर डायने रफेला डी सिल्वा (वय 31) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, सिल्वा एका दुसऱ्या व्यक्तीसोबत दुचाकीवर बसून बारमध्ये आली होती. त्यावेळी तिचा पती त्याच्या 5 मित्रासोबत बसला होता. बारमध्ये येताच सिल्वाने बॅरोलाच्या डोक्यावर गोळी झाडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पती सिल्वाच्या हातून पिस्तुल घेण्याचा प्रयत्न केला. घटनेच्या अगोदर 5 तास आधीच तिने पिस्तुल खरेदी केले होते. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. सिल्वा आपल्या पतीसोबत दुसऱ्या महिलेला पाहून संतापली होती. घटना ज्या बारमध्ये झाली तो बार सेक्स वर्कर्ससाठी ओळखला जातो. नंतर सिल्वाने पोलिसांना सांगितले की, तिने पतीच्या आसपास असलेली गर्दी दूर करण्यासाठी निशाणा न लावता गोळी झाडली होती. तिला मृत मुलीबाबत माहिती नव्हती. या घटनेदरम्यान बारमधील एका 24 वर्षीय तरूणालाही गोळी लागली. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.