‘धोकेबाज’ पत्नी घटस्फोट देण्यास गेली, पतीनं 2 मुलांसह 9 व्या मजल्यावरून मारली उडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या पत्नीकडून धोका मिळाल्यामुळे एका व्यक्तीने आपल्या दोन्ही मुलांसह 9 व्या मजल्यावर उडी मारुन आत्महत्या केली. यात त्या व्यक्तीसह मुलांचा मृत्यू झाला. रशियाच्या सारातोव मध्ये राहणाऱ्या रोमन मिखइलोव या 30 वर्षीय व्यक्तीची पत्नी त्याला घटस्फोट देणार होती. रोमनने आपल्या दोन्ही मुलांसह बाल्कनीत जाऊन एक फोटो काढून पत्नीला पाठवला. यानंतर इरिना फोटो पाहून लगेचच एक आपल्या घराकडे निघाली परंतू तो पर्यंत वेळ निघून गेली होती.

डॉक्टरांच्या मते मिखइलोव याचा जागीच मृत्यू झाला. तर नवजात मुलाचा देखील मृत्यू झाला आहे. यात 4 वर्षांच्या मुलीला सोफियाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
रोमने आपल्या पत्नासाठी एक चिट्टी सोडली आहे. त्याने त्यात सर्व दोष आपल्या पत्नीला दिला आहे. पती आणि मुलांच्या मृत्यूमुळे महिलेला धक्का बसला आहे.

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुटूंब साधारण होते. त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नव्हता, सर्व काही सुरळीत होते. एका शेजाऱ्याने सांगितले की त्या दोघांमध्ये वाद झाल्याचे आम्ही कधी पाहिले नाही.

Visit : Policenama.com