‘JEE Main 2018’चा निकाल जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

जेईई मेन 2018 या परीक्षेच्या पहिल्या पेपरचा निकाल जाहीर झाला आहे. दुसऱ्या पेपरचा निकाल उद्या जाहीर होईल. आंध्र प्रदेशातील विजयवाडा इथे राहणाऱ्या सुरज कृष्णा या विद्यार्थ्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

या परीक्षेत एकूण 2 लाख 31 हजार 24 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सामान्य प्रवर्गात एक लाख 11 हजार 275 (कटऑफ 74), ओबीसी-एनसीएल प्रवर्गात 65 हजार 313 (कटऑफ 45), अनुसूचित जाती 34 हजार 425 (कटऑफ 29), अनुसूचित जमाती 17 हजार 256 (कटऑफ 24) आणि दिव्यांग श्रेणीतील 2 हजार 755 (कटऑफ -35) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

परीक्षा दिलेले विद्यार्थी jeemain.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.