मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, आता JEE देता येणार मराठीतून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक वृत्त समोर येत आहे. देशातील आघाडीच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी JEE Main ही प्रवेश परीक्षा आता यापुढे प्रादेशिक भाषांमध्ये देखील घेतली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल (Ramesh Pokhriyal) यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) मध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे असे पोखरियाल यांनी सांगितलं. Joint Admission Board (JAB) तर्फे IIT मधल्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर JEE ही परीक्षा घेतली जाते.

आयआयटी तसेच अन्य मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी IIT JEE ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी विद्यार्थी दहावीच्या आधीपासूनच तयारीला लागतात. विशेष म्हणजे मातृभाषेतून जे विद्यार्थी शिक्षण घेत असतात त्यांना त्यांच्या भाषेतूनच प्रश्नांची उत्तरे लिहिणं हे सोयीस्कर जाते. त्यामुळे राज्य पातळीवरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषेतून उत्तरं लिहिण्याची मुभा असायला हवी, असे रमेश पोखरियाल निशांक यांनी गुरुवारी सांगितलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like