JEE Mains : निकाल वेळेपूर्वीच जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यंदा नियोजित वेळेपूर्वीच निकाल जाहीर केला आहे. जेईई मेन्स परीक्षेचा निकाल आजच लावत ‘एनटीए’ने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. यंदाच्या परीक्षेत १५ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत. यापैकी तीन विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. ‘एनटीए’ने प्रत्येक राज्यानुसारही गुणांकन यादी जाहीर केली आहे. एकूण ९,२९,१९८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. महाराष्ट्राच्या राज आर्यन अगरवाल, अंकितकुमार मिश्रा आणि कार्तिकेय गुप्ता या तिघांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत.

या परीक्षेचा निकाल ३१ जानेवारी रोजी जाहीर केला जाईल, असे यापूर्वी घोषित करण्यात आले होते. पण त्यापूर्वीच तब्बल ११ दिवस हा निकाल जाहीर झाला आहे. यंदापासून जेईईचे निकाल पर्सेंटाईलमध्ये दिले जाणार आहेत. त्यामुळे यंदा एकाहून अधिक ‘टॉप स्कोअरर’ विद्यार्थी असू शकतात.

असा पहा निकाल

https://jeemain.nic.in/webinfo/Public/Home.aspx या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील.

https://jeemain.nic.in/webinfo/Public/Home.aspx या संकेतस्थळावर जाऊन ऍप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख टाकली, की निकाल पाहता येईल.