‘जीवन में लालू हैं, कण-कण में लालू हैं’ : विरहाने व्याकूळ राबडीदेवींनी रचली कविता

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारच्या राजकारणाचे केंद्रबिंदू मानले जाणारे राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांचा गेल्या चार दशकांनंतर प्रथमच बिहारच्या निवडणुकीच्या प्रचारात सहभाग दिसणार नाही. कारण लालूप्रसाद यादव सध्या कारावासाची शिक्षा भोगत आहेत. शिवाय बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांची पत्नी राबडी देवी या लालूंच्या विरहाने व्याकूळ झाल्या आहेत. आपल्या भावना राबडी देवी यांनी कवितेच्या माध्यमातून सोशल मीडियावर मांडल्या आहेत. ट्विटरवर त्यांनी एक कविता पोस्ट केली आहे.

लालूंच्या दोन्ही मुलांमध्ये पक्षातील वर्चस्वाला घेऊन लढाई सुरु आहे. लालूंचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांनी आपल्या धाकट्या भावाविरोधात बिगुल फुंकले आाहे. अशातच लालूप्रसाद यादव हे कारावासाची शिक्षा भोगत आहेत. कुटुंबामध्ये कलह सुरु आहे अशा लालूंची अनुपस्थिती असल्याने राबडी देवी व्यथित झाल्या आहेत. राबडी देवी या दु:खी झाल्या असून त्यांनी एक कविता पोस्ट केली आहे. ‘जीवन मे लाल हैं, कण-कण में लालू हैं’ अशा आशयाची ही कविता आहे.

दरम्यान लालूंचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले आहे. तेजप्रताप यादव यांनी लालू राबडी मोर्चा उघडण्याची घोषणा केली आहे. तेजप्रताप यांनी तेजस्वी यादव यांनाही अल्टिमेटम दिले आहेत. तेजप्रताप यांचे त्यांच्या पत्नीचेही मतभेद आहेत, त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे असेही समजत आहे. तेजप्रताप यांचे सासरे चंद्रिका राय यांना सारण येथून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारी तेजप्रताप यादव प्रचंड नाराज झाले आहेत असेही समजत आहे.