Jeevan Pramaan – Life Certificate | जर तुम्ही सुद्धा घेत असाल पेन्शन तर ‘या’ 5 पद्धतीने जमा करू शकता हयातीचा दाखला, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी कर्मचार्‍यांना पेन्शन विना अडथळा घेत राहण्यासाठी दरवर्षी आपला हयातीचा दाखला (Jeevan Pramaan- Life Certificate) जमा करणे आवश्यक आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला द्यावा लागतो, परंतु जर कुणी 80 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे असेल तर त्यांना अतिरिक्त सूट सह दोन महिन्याचा वेळ दिला जातो. म्हणजे ती व्यक्ती हयातीचा दाखला जमा करू शकतो. (Jeevan Pramaan- Life Certificate)

 

यानंतर कर्मचार्‍यांना वर्षभर पेन्शन, त्यांच्या खात्यात पाठवली जाते. सामान्यपणे पेन्शनधारक हयातीचा दाखला, बँक, पोस्ट आणि ऑनलाइन माध्यमातून हे कागदपत्र जमा करू शकतात. येथे पाच अशाच पद्धती सांगितल्या आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमचा हयातीचा दाखला सहज जमा करू शकता. (Jeevan Pramaan- Life Certificate)

 

जीवन प्रमाण पोर्टल
तुम्ही जीवन प्रमाणपत्र पोर्टल https://jeevanpramaan.gov.in/ वर आपले लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता. यासाठी अगोदर पोर्टलवरून जीवन प्रमाणपत्र डाऊनलोड करावे लागेल. याशिवाय UDAI द्वारे मान्य फिंगरप्रिंट डिव्हाईस पाहिजे.

 

बँकेत जाऊन जमा करणे
तुमची पेन्शन येते त्या बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, परंतु तुम्हाला डोअरस्टेप बँकिंग सेवेमध्ये शुल्क भरावे लागेल.

घरीच हयातीचा दाखला जमा करणे
देशभरात 12 सरकारी बँका अशा आहेत त्यांच्या सर्व्हिसेस अंतर्गत लाईफ सर्टिफिकेट जमा करता येते. या 12 बँकांत SBI, PNB, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक, UCO बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.

 

तुम्ही वेबसाइट (doorstepbanks.comwww.dsb.imfast.co.in/doorstep/login),
किंवा ‘डोअरस्टेप बँकिंग’ मोबाइल अ‍ॅप्लिकेशन, किंवा टोल-फ्री नंबर (18001213721 किंवा 18001037188)
वर कॉल करून बँकेची डोअरस्टेप सेवा बुक करू शकता.

 

पोस्टाच्या माध्यमातून
मागील वर्षी नोव्हेंबर 2020 मध्ये पोस्टमनद्वारे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याची डोअर स्टेप सर्व्हिस लाँच झाली होती.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक पोस्टमन आणि ग्रामीण पोस्टमनद्वारे ही सुविधा दिली जाते.
मोबाइलद्वारे ही सुविधा मिळवण्यासाठी पेन्शनर्सला गुगल प्ले स्टोअरवरून Postinfo App इन्स्टॉल करावे लागते.

 

नियुक्त अधिकार्‍याच्या माध्यमातून
जर पेन्शनधारकाने एखाद्या नियुक्त अधिकार्‍याच्या माध्यमातून हयातीचा दाखला दिला तर पेन्शन धारक व्यक्तीला उपस्थित राहण्याची आवश्यकता नसते.
अधिकार्‍याच्या माध्यमातून हयातीचा दाखला घेतला जातो.

 

 

Web Title :- Jeevan Pramaan – Life Certificate | if you also raise pension then you can submit life certificate in these five ways know the complete process

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Monalisa | श्रीदेवीच्या गाण्यावर मोनालिसाचा जलवा, ‘हवा-हवाई’ या गाण्यावर नाचून चाहत्यांचं जिंकलं मन.

Pune Crime | पुण्याच्या सांगवीमध्ये ‘धडाधड’ 10 गोळ्या झाडून सराईत गुन्हेगार योगेश जगतापचा ‘खात्मा’; पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड खळबळ

Dearness Allowance Hike | ‘या’ कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये होणार 7 % वाढ, पागारातही होणार बंपर वाढ