…म्हणून जगातील सर्वात श्रीमंत बेजोस यांच्याविरूध्दची याचिका कोर्टानं फेटाळली, जेफ यांनी गर्लफ्रेन्डच्या भावाकडे मागितले 12 कोटी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ऍमेझॉन कंपनीचे मालक जेफ बेजोस यांनी आपल्या गर्लफ्रेंडच्या भावाकडून नुकसान भरपाई म्हणून 12.3 कोटींची मागणी केली आहे.

जेफ बेजोस यांची गर्लफ्रेंड लॉरेन सॅन्चेज हिचा भाऊ मायकल सॅन्चेजने बेजोस यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. मात्र, मायकल हा खटला हारले. त्यामुळे आता बेजोस यांनी मायकल यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कायदेशीर फी (Legal Fees) म्हणून खर्च झालेले पैसे मायकल यांनी द्यावे, असे बेजोस यांचे म्हणणे आहे.

2019 मधील आहे हे प्रकरण
बेजोस आणि मायकल यांच्यातील वादाच्या या प्रकरणाला 2019 मध्ये सुरुवात झाली होती. तेव्हा बेजोस आणि लॉरेन हे विवाहित होते. मात्र, बेजोस आणि लॉरेन यांच्या प्रेमसंबंधाची माहिती नॅशनल एन्क्वायरर आणि पेज सिक्स या मासिकांमधून उघड झाली.

नुकसान भरपाई म्हणून 12 कोटींची मागणी
जेफ बेजोस यांनी हे प्रकरण न्यायालयात जिंकले. मात्र, न्यायालयात खटला चालवण्यासाठी त्यांना जी फी भरावी लागली, त्याबदल्यात त्यांनी 12.3 कोटींची मागणी मायकल सॅन्चेजकडे केली.

पुरावा नसल्याने याचिका फेटाळली
मायकल याने बेजोस यांनी लावलेल्या आरोपामुळे त्यांची मानहानी झाली, असे न्यायालयात सांगितले होते. मात्र, त्याबाबतचे पुरावे नसल्याने न्यायाधीशांनी ही याचिका फेटाळून लावली.