…म्हणून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांना विकावे लागले Amazon चे 17,600 कोटींचे शेअर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जगातील सर्वात श्रीमंतांपैकी एक असलेल्या ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक जेफ बेजोस यांनी आपल्या कंपनीच्या हिस्सेदारीत कपात केली आहे. जेफ बेजोस यांनी प्री-अरेंज्ड ट्रेडिंग प्लॅनअंतर्गत आज अ‍ॅमेझॉनचे 7,39,032 शेअर विकले. ज्याची किंमत 2.4 बिलियन डॉलर म्हणजेच 17,600 कोटी रुपये आहे.

जेफ बेजोस यांनी या आठवड्यात कंपनीचे सुमारे 5 बिलियन डॉलर म्हणजे 36,000 कोटींपेक्षा जास्त शेअर विकले. गेल्या आठवड्यात त्यांनी यूएस स्टॉक एक्सचेंजमध्ये फायलिंगमध्ये सांगितले, की ते कंपनीत 20 लाख शेअर विकणार आहेत. Amazon ने हिस्सेदारी कपात केल्यानंतरही त्यांचा 10 टक्क्यांपेक्षा जास्त स्टेक आहे. ज्याची एकूण नेटवर्थ 192.1 बिलियन डॉलरचा अधिकांश हिस्सा येतो.

जगातील सर्वात श्रीमंतांपैकी एक

ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार, जेफ बेजोस सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 1997 मध्ये पब्लिक झाल्यानंतर आत्तापर्यंत जेफ बेजोस यांनी कंपनीत 20 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सेदारी कमी केली आहे. गेल्या वर्षी जेफ बेजोस यांनी कंपनीत त्यांची हिस्सेदारी विकली. 10 बिलियन डॉलरपेक्षा जास्त जमा केले होते.

17,600 कोटींचे शेअर विकले

जेफ बेजोस यांनी प्री-अरेंज्ड ट्रेडिंग प्लानअंतर्गत अ‍ॅमेझॉनचे 7,39,032 शेअर विकले आहेत. त्याची किंमत 2.4 बिलियन डॉलर म्हणजेच 17,600 कोटी रुपये आहे. एक दिवसापूर्वीही जेफ बेजोस यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात शेअर विकले होते.