जेजुरी- सासवड रस्त्यावर पिकअप, टेम्पो, दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

जेजुरी (संदीप झगडे) : पोलीसनामा ऑनलाइन –  जेजुरी सासवड रस्त्यावर लवथळेश्वर परिसरातील भारत पेट्रोल पंपा समोर पिकअप जीप,टाटा टेम्पो व ऍक्टिव्हा या दुचाकीचा अपघात होऊन या अपघातात जेजुरी येथील तरुणांचा मृत्यू झाला .हा अपघात आज दुपारी झाला.या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव जीवन दास उत्तम कोळी वय 27 रा. जाणूबाई आळी जेजुरी असे आहे.

या अपघाताबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जेजुरी सासवड रस्त्यावर लवथळेश्वर परिसरातील भारत पेट्रोल पंपा समोर एका टेम्पो ने समोरून येणाऱ्या पिकअप जीपला धडक दिली, त्यानंतर समोरून येणाऱ्या अक्टिव्हा दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वार जीवनदास कोळी हा तरुण गंभीर जखमी झाला.जेजुरी येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असताना या तरुणांचा मृत्यू झाला . या तरुणांचा भाऊ अमरजीत कोळी यांनी या अपघातात बाबत फिर्याद दाखल केली आहे .

टेम्पो चालक शिवाजी तुकाराम बांदल रा. झणझणे,सासवड ता. फलटण, जि.सातारा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेली दोन महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात याच ठिकाणी हा तिसरा अपघात होऊन प्रत्येक अपघातात एक या प्रमाणे तिघांचा बळी गेला आहे.गेली दोन वर्षांपूर्वी जेजुरी हडपसर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम झाले अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट झाले आहे.भारत पेट्रोलपंपा समोर पुलाचे व रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने हा रस्ता अरुंद झाला आहे त्यामुळे सतत येथे अपघात होत आहेत.सतत होणाऱ्या अपघातामुळे ग्रामस्थ संतापले असून तातडीने या पुलाचे व रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like