जेजुरी : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान, सासवडमध्ये तीन दुकानदारांवर गुन्हे दाखल

सासवड : पोलीसनामा ऑनलाइन टीम (संदीप झगडे) – कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातल्याने मोठे संकट उभे राहीले आहे. या विषाणू पासून बचावासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यानी आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. याची सर्व स्तरावर प्रभावीपणे अमल बजावणी केली जात आहे. पुरंदर च्या तहसिलदार रूपाली सरनोबत यांनी वारंवार आवाहन करूनही याआदेशाचा अवमान करणाऱ्या सासवड मधील तीन दुकानदाराना पोलीसांनी चांगलाच दणका दिला आहे.

बधाई स्वीट होमचे तुळशीराम बेलाजीरामजी चौधरी, मावा टपरी चालक बाळासाहेब लक्ष्मण म्हेत्रे आणि संजीवनी आईस्क्रीम पार्लर चे अर्जुन भवानी जाट या तीघावर भा. द. वि. क 188 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहूल घुगे. पोलीस हवालदार के. एन. माने,एस एम चांदगुडे, महेश खरात, कृष्णा कानतो डे. गोपनीय विभागाचे भगीरथ घुले,पोलीस नाईक अजित माने, राहूल कोल्हे यानी ही कारवाई केली आहे.