Lockdown 3.0 : जेजुरीतील ‘सुवर्णस्टार’ने बेघर अनाथ व मजुरांना दिला ‘आधार’

जेजुरी (संदीप झगडे): तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्या नंतर तीर्थक्षेत्र व औद्योगिक नगरीमुळे बेरोजगार झालेले मजूर,बेघर अनाथ व गरीब नागरिकांना जेजुरी शहरातील सुवर्णस्टार,उघडा मारुती मित्र मंडळ,जेजुरी देवसंस्थान यांच्या माध्यामतून सलग ४५ दिवस नाष्टा जेवण व त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली असून लॉकडाऊन संपेपर्यंत जेजुरीतील तरुण वर्ग हि सेवा उपलब्ध करून देणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्या नंतर जेजुरी एमआयडीसी मधील अनेक परप्रांतीय कामगार,तसेच मजूरवर्ग यांना त्यांच्या गावाला जाता आले नाही .त्यामुळे हा मजूर वर्ग, शहरातील बेघर,अनाथ संकटात सापडले. जेजुरी पालिकेने पुढाकार घेवून सुमारे ७० ते ८० व्यक्तींना येथील शाळेत आश्रय दिला. शहारातील सुमारे दोन हजार गरजू व्यक्तींना जेजुरी देवसंस्थान, उघडा मारुती मित्र मंडळ, सुवर्णस्टार मित्र मंडळ,सेव्ह ए लाईफ,जेजुरी युवा क्लब तसेच महिला बचतगट आदींनी विशेषत; तरुण वर्गाने पुढाकार घेवून या नागरिकांची जेवण, नाष्टा,आदी सुविधा उपलब्ध केल्या. तसेच आमदार संजय जगताप मित्र परिवार,जेष्ठ नेते दिलीपदादा मित्र परिवार,जेजुरी पोलीस स्टेशन,जेजुरी शहर मनसे व आदी संस्थांनी गरजू लोकांना अन्नधान्याचे कीट देवून आधार देण्याचे काम केले आहे.

जेजुरी शहरातील सुवर्णस्टार मित्र मंडळ व सेव्ह ए लाईफ या संघटनेतील तरुणांनी बेघर,अनाथ तसेच मजूर,या लॉकडाऊनच्या काळात काम करणारे सफाई कामगार व गरजू अशा साडे तीनशे लोकांची दररोज नाष्टयाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरुण कार्यकर्त्यांनी स्वताची वर्गणी तसेच देणगीदारांच्या सहकार्यातून सलग पंचेचाळीस दिवस सलग पणे हा उपक्रम राबविला आहे. दररोज सकाळी २० ते २५ कार्यकर्ते या ठिकाणी राबत आहेत. चहा,पोहे,उपीट,शिरा,मिसळपाव,पुरी भाजी,कुर्मा पुरी,पुलाव, वडासांबर,पिठलं भाकरी आणि आमरस पुरीचा बेत करून या गरजू नागरिकांना संकट काळात आधार दिला आहे.

मंडळाचे अध्यक्ष रज्जाक तांबोळी, पदाधिकारी मनोज मोहिते,राजेंद्र बारभाई,रमेश गाढवे,नवनाथ चव्हाण, अविनाश झगडे,प्रीतम बारभाई,फिरोज तांबोळी,इम्रान मुलाणी,योगेश तुपे,योगेश खाडे आदी कार्यकर्ते दीडमहिना हा उपक्रम राबवीत आहे.