पुणे जिल्ह्यातील घटना : प्रेम संबंधातुन ग्रामसेवकाकडून प्रियसीच्या पतीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

जेजुरी : अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने पुरंदर तालुक्यात ग्रामसेवकाने एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आसुन त्या ग्रामसेवकावर सासवड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रमेश जयवंत भालेराव रा.व्येकटश नगरी स्वप्ना नगरी सासवड (वय ४०) व्यवसाय नोकरी पुरंदर पंचायत समिती मध्ये ग्रामसेवक पदावर त्याचे आरोपी असणाऱ्या वृषाली संतोष चव्हाण ३२ रा. भादे, ता. खंडाळा जि. सातारा यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याने अडथळा ठरत असणाऱ्या आरोपी वृषाली यांचे पती संतोष बाळासाहेब चव्हाण राहणार भादे ता. खंडाळा जि. सातारा यांला २ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी साडे दहाच्या पूर्वी हिवरे (ता. पुरंदर) पश्चिमेच्या हद्दीत वाघ डोंगरा नजिक जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी झाला असून सध्या संतोष चव्हाण पिंंपरी येथील खाजगी रुग्नालयात वैद्यकीय उपचार घेत आहेत.

रमेश भालेराव याला ३ ऑगस्ट रोजी अटक केली असून त्याला सासवड न्यायालयात हजर केले असता १० ऑगस्ट पर्यंत पोलिस कस्टडी देण्यात आली होती. व वृषाली संतोष चव्हाण हिला दिनांक ७ ऑगस्ट रोजी अटक केली असून १० ऑगस्ट पर्यंत पोलिस कस्टडी देण्यात आली होती. मात्र पुन्हा सासवड न्यायालयात हजर केले असता दोघांनाही १४ ऑगस्ट पर्यंत पोलिस कस्टडीत वाढ करण्यात आली आहे. पुढील तपास सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे, पोलीस हवालदार भरती आर्डी, संदीप चांदगुडे, महेश खरात, विक्रम भोर, प्रतीक धिवार हे करीत आहेत.