जेजुरी : जवळार्जुन जवळील चोरवाडीत कोरोनाचा पॉझीटिव्ह रुग्ण ; तहसीलदारांकडून या भागाची पाहणी

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन – (संदीप झगडे) : पुरंदर तालुक्यात प्रशासनाने काळजी घेवूनही नागरिकांच्या निष्काळजीपणा मुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दि २६ रोजी हडपसर येथील एका नामांकित औषध तयार करणाऱ्या कंपनीतील आणखी दोन रुग्ण पोझीटिव्ह निघाले.तालुक्यातील जवळार्जुन व सासवड येथे हे रुग्ण आढळून आले आहेत. पुरंदर तालुक्यात कोरोना बाधित एकूण पाच रुग्ण असून यातील दोन जन पोलीस दलातील जवान आहेत.

कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावा मुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी आज जवळार्जुन जवळील चोरवाडीला भेट दिली. चोरवाडी येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रथम सात जण हाय रिस्क असणाऱ्या व्यक्तींना जेजुरी येथील एका लॉज मध्ये ठेवण्यात आले तर लो रिस्क मध्ये असणाऱ्या वीस जणांना घरातच विलगीकरण करण्यात आले.

चोरवाडी,संजोबाचा मळा, प्रतिबंधित क्षेत्र तर मावडी कडेपठार,जवळार्जुन, विठ्ठलवाडी,राणेवस्ती आरांदीचा मळा यांचा समावेश बफर झोन मध्ये करण्यात आला आहे. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी विवेक आबनावे, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर,मंडळ अधिकारी गोपाळ लाखे,तलाठी शीतल खराद ,हमीद शेख यावेळी उपस्थित होते. तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाला उपयायोजने बाबत सूचना दिल्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like