जेजुरी : कोथळे विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील कोथळे येथील श्री मल्हार शिक्षण संस्थेच्या विद्यामहामंडळ प्रशालेच्या दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून या विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आली आहे .

पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या विद्यामहामंडळ प्रशालेने गेली 25 वर्षे शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा, कलाक्षेत्रात नावलौकिक मिळविले आहे. गेली 25 वर्षे दहावीच्या निकालात उत्कृष्ट गुणवत्ता विद्यालयाने राखली आहे . या वर्षी हि या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे . या विद्यालयातील अश्विनी संतोष तोरवे हिने 94 टक्के गुण मिळवुन प्रथम, हेमा मोहन भोसले हिने 93.60 गुण मिळवून द्वितीय तर निकिता विनायक कापरे हिने 90 . 80 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

पुरंदर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, श्री मल्हार शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा चंद्रलेखा जगताप, पदाधिकारी ज्ञानेश्वर भोईटेगुरुजी, शंकरनाना जगताप, वसंतआबा जगताप,पी एम जगताप, शामकांत जगताप, राजेन्द्र जगताप, वंदना जगताप, नरेंद्र जगताप संतोष भोसले,तुषार खैरे, खुशाल कुदळे,विजय जगताप आदींनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक एच दि दरेकर, नितीन राऊत, एकनाथ देवकर, काशिनाथ भोंग, प्रशांत कदम , सुग्रीव चव्हाण, किशोर भालेराव, सुनील अंजराकर, कैलास भोसले, अशोक साबळे, धोंडीराम पवार यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले