जेजुरी : कुंभारवळण मंडल अधिकाऱ्यांच्या नोंदी तपासणीचे प्रांताचे आदेश

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे)  नोंदीमध्ये अनियमितता असल्याची तक्रार दाखल कुंभारवळण (ता. पुरंदर) मंडल अधिकारी कार्यालयातील अधिकारी हे आपल्या कामात हलगर्जीपणा करत असल्याने व आर्थिक देवाण-घेवाण करत असल्याने अनेक नोंदी प्रलंबित ठेवत असल्याची तक्रार ग्राहक हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष महेश राऊत यांनी उपविभागीय अधिकारी दौंड पुरंदर यांच्याकडे दाखल केल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी नोंदी तपासण्याचे आदेश कार्यालयातील नायब तहसीलदार सुहास सोमा यांना दिले आहेत.

कुंभारवळण येथील मंडल अधिकारी श्रीमती पद्मावती कोरे ह्या महिला मंडलाधिकारी असल्याने त्यांच्याविरुद्ध कोणीही तक्रार करत नाही. परंतु शेतकऱ्यांना जाणून-बुजून त्रास देत असतात. शेतकऱ्यांना सातत्याने हेलपाटे मारावे लागत आहेत व प्रत्येक नोंदीला आर्थिक देवाण-घेवाण केल्याशिवाय कोणत्याही नोंदीचा फेरफार मंजूर करत नाहीत. आर्थिक देवाण-घेवाण न झाल्यास सरळ नोंदीचा फेरफार रद्द केले जातो. असे तक्रारीत महेश राऊत यांनी म्हटले आहे.

कुंभारवळण मंडल च्या अंतर्गत बेलसर, खळद, शिवरी, साकुर्डे, वाळुंज, मावडी सुपे, कुंभारवळण, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, निळुंज, पारगाव, सिंगापूर, अशी गावे येतात. सदर चा हा भाग विमानतळ बाधित शेतकऱ्यांचा असल्यामुळे येथे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या खात्याच्या दुरुस्त्या करून घेत आहेत. त्यामुळे या भागांमध्ये नोंदीचे प्रमाणही जास्त आहे. सध्या मंडल अधिकारी यांच्याकडे अंदाजे अडीशे च्या आसपास नोंदी प्रलंबित आहेत.

कुंभारवळण मंडल अधिकारी यांच्या सर्व नोंदी तपासण्याचे काम सुरू आहे. तक्रारदार यांनी दिलेला नोंदणीचा आकडा कमी-जास्त होऊ शकतो त्यामुळे मंडलाधिकारीचे दप्तर तपासून ज्या नोंदी प्रलंबित असणाऱ्या नोंदी चे फॉर्म भरून अहवाल लवकरच उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करणार- सुहास सोमा नायब तहसीलदार

सदरच्या नोंदी ह्या लोकसभा व विधानसभा निवडणूक त्याचबरोबर अतिवृष्टी, ऑनलाइन च्या तांत्रिक अडचणी, कार्यालय मध्ये लाईट व्यवस्था नसणे, गाव कामगार तलाठी यांच्याकडून वेळेत निर्गमित न होणे, यामुळे या नोंदी प्रलंबित आहेत.
प्रभावती कोरे मंडलाधिकारी कुभारवळण

Visit : Policenama.com