छेडछाड व त्रासाला कंटाळून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून याप्रकरणी दोन जणांविरुद्ध जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी तरुणी कॉलेजला जात असताना तिला रस्त्यात थांबवून फिर्यादी तरुणीचा हात पकडून तू मला आवडतेस माझ्याशी लग्न करशील का? असे विचारले तसेच तिचा विनयभंग केला. तसेच तू जर माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुझ्या वडिलांना मारेन व गावात तुझी बदनामी करेन अशी धमकीही आरोपीने फिर्यादी तरुणीस दिली. या सगळ्या त्रासाला कंटाळून फिर्यादी तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भा.द.वि.कलम ३५४(अ),३५४(ड),३०५, ५११, ५०४,३४१ बाल लैंगिक अ.प्र.का.क.१२ नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/