महेश राऊत वीर- भिवडी गटाच्या अध्यक्षपदी

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे)- पुरंदर तालुक्यातील वीर-भिवडी जिल्हा परिषद गटाच्या अध्यक्षपदी सुपे येथील रहिवासी महेश मारुती राऊत यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले.

सासवड येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी महेश राऊत यांची नियुक्ती करण्यात आली. महेश राऊत यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस कडून भिवडी पंचायत समिती गणातून पंचायत समितीची निवडणूक लढली होती. व ग्राहक हक्क संरक्षण समितीच्या पुरंदर तालुका अध्यक्षपदी ही राऊत यांनी काम केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली असल्याचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी सांगितले.

निवडीनंतर शरदचंद्रजी पवार व अजित दादा पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीसाठी एकनिष्ठेने काम करणार असल्याचे महेश राऊत यांनी सांगितले. यावेळी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, ईश्वर बागमार, पुष्कराज जाधव, राहुल गिरमे, बापू जगताप, संदेश पवार आदी उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा –