तीर्थक्षेत्र जेजुरी मार्तंड देव संस्थान पूरग्रस्त एक गाव घेणार दत्तक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले जेजुरी मार्तंड देवसंस्थानाने पूरग्रस्त एक गाव दत्तक घेण्याचे ठरवले आहे. जेजुरी देवसंस्थांनाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रमुख विश्‍वस्त अशोकराव संकपाळ, विश्‍वस्त राजकुमार लोढा, शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, सॉलिसिटर प्रसाद शिंदे, तुषार सहाने, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

जेजुरी देवसंस्थांनाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील एक गाव दत्तक घेऊन त्या ठिकाणी एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तू-धान्य, घर डागडुजीसाठी मदत, पिण्याचे पाणी, शालेय वस्तू, संसार उपयोगी भांडी अशी मदत प्रत्यक्ष जाऊन केली जाणार आहे. कोल्हापूरचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्याशी याबाबत संपर्क झाला आहे.

तसेच देवसंस्थानाच्या ७० कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेण्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. शुक्रवारी(दि. १६) विश्वस्त मंडळ कोल्हापूर येथे जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार एक गाव ठरविणार आहे आहे.

आरोग्यविषयक वृत्त –