तीर्थक्षेत्र जेजुरीच्या मार्तंड देवसंस्थांच्या मुख्य विश्‍वस्त पदी ॲड. संकपाळ

 जेजुरी :पोलीसनामा ऑनलाइन  – तीर्थक्षेत्र जेजुरी श्री मार्तंड देवसंस्थांच्या प्रमुख विश्वस्तपदी ॲड. अशोकराव पिराजी संकपाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते प्रमुख विश्वस्त शिवराज झगडे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. श्री मार्तंड देव संस्थान समितीवर 18 महिन्यांपूर्वी सात विश्‍वस्तांची नियुक्ती करण्यात आली.

सात विश्‍वस्तांच्या ठरावानुसार प्रत्‍येक विश्‍वस्तांना नऊ महिन्यांचा कालावधीसाठी प्रमुख विश्‍वस्त पदावर काम करण्याची संधी दिली जाणार आहे. यानुसार मुख्य विश्‍वस्त झगडे यांनी राजीनामा दिल्याने ॲड. संकपाळ यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी विश्‍वस्त संदीप जगताप, राजकुमार लोढा, प्रसाद शिंदे, तुषार सहाने, पंकज निकुडे, जेजुरी नगराध्यक्षा वीणा सोनवणे, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

ॲड. संकपाळ हे मूळचे कळवंतवाडी- आंबळे येथील रहिवासी असून त्यांनी पुणे जिल्हा बार असोशिएयनचे अध्यक्ष पुणे लॉयर्स कंझ्युमर्स सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी काम केले आहे.
पुढील काळात गडकोट आवार, पायरी मार्ग, डागडुजी- दुरुस्तीच्या कामांकडे लक्ष केंद्रित करणार आहे असे ॲड. संकपाळ यांनी सांगितले.

आरोग्य विषयक वृत्त

त्वचेचा ‘ग्लो’ वाढवायचाय ? ‘या’ उपायांनी दिसेल ७ दिवसात परिणाम

लिव्हरसाठी ‘हे’ पदार्थ धोकादायक

नपुंसकता आणि कमजोरी नष्ट करते ‘खारीक’

‘हे’ उपाय केल्याने नियंत्रणात राहील रक्तदाब