जेजुरीच्या औद्योगिक वसाहतीतील परप्रांतीय परतीच्या मार्गावर

जेजुरी  : पोलीसनामा ऑनलाइन –   जेजुरी एम आय डी सी मध्ये दोनशे कंपन्या असून या विविध कंपन्यात देशाच्या विवध राज्यातून हजारोंच्या संखेने मजूर काम करत होते परंतु देशभर पसरलेल्या कोरोना महामारीच्या संकटाने देशाच्या अर्थ व्यवस्थेवर मोठा घाला घातला आहे, परंतु दोन महिन्याच्या सामाजिक मदती वर तग धरलेल्या मजुरांचा आपल्या राज्यात जाण्याकरिता धडपड सुरु झाली आहे तर जेजुरी पोलीस प्रशासन त्यांना लवकरच कंपन्या चालू होतील असे आव्हान करत आहे, परंतु सोय सुविधांचा अभाव ठेकेदरानी अंग कडून घेतले आहे त्यातच आर्थिक चणचण आणि खाण्यापिण्याचे होणारे आभाळ यामुळे आपल्या राज्यात जाण्याच्या तयारीत असल्याचे चित्र एम आय डी सी त पाहवयास मिळते कारण गेली काही दिवस सतत येथील आरोग्य तपासणी विभागाचे डॉक्टर दिग्विजय भिसे महेश मसराम, जेजुरी मेडिकल असोशियनचे डॉ नितीन केंजळे, डॉ सुपेकर आणि आरोग्य सेवक तसेच जेजुरी महविद्यालय विद्यार्थी, कार्यकर्ते, परप्रांतीय मजूर आणि त्यांच्या परिवाराची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्य दाखले देत आहेत. यात सुमारे दोन ते तीन हजार मजूर कामगारांची तपासणी पूर्ण झाल्याची माहिती डॉ मसराम यांनी दिली आहे.

आपल्या राज्यात जाण्याकरिता शासनाने लगेच प्रयत्न करावेत अशी अपेक्षा एका महिला मजूर पत्नीने डोळ्यात पाणी आणून आपली व्यथा सांगितली आहे.याबाबत तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी येथील मजुरांच्या परस्तिथीती बद्दल माहिती दिली असून शासन लवकरच मजुरांच्या परतीच्या प्रवास बद्दल पूर्ण प्रयत्नशील असून परराज्यातील आयुक्तांची परवानगी मिळताच त्यांची जाण्याची सोय केली जाईल अशी माहिती दिली आहे. या बाबत या मजुरांच्या सोय सुविधा देण्या बाबत आणि कंपन्या सूर कधी होतील असा सवाल जेजुरी जिमा असोशियन अध्यक्षांना केला असता त्यांनी घुमजाव केला आहे.