जेजुरी नगर परिषदेच्या वतीने फेरीवाले सदस्यांना ओळखपत्रांचे वाटप

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – जेजुरी नगरपरिषदेच्या वतीने पालिका सभागृहात शहर फेरीवाला समितीची बैठक घेऊन फेरीवाला सर्वेक्षण प्रारूप यादीला मान्यता देण्यात आली. यावेळी जेजुरी पालिकेच्या मुख्याधिकारी व शहर फेरीवाला समितीच्या अध्यक्षा पूनम कदम यांच्या हस्ते समिती सदस्यांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.

जेजुरी नगरपरिषदेच्या वतीने शहर फेरीवाला समितीची बैठक नुकतीच झाली. यावेळी फेरीवाला सर्वेक्षण बाबतची प्रारूप यादी सभेपुढे ठेवण्यात आली. या यादीला समिती सदस्यांनी मान्यता दिली असून ही यादी नगरपरिषदेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. या यादीवर नागरीक व फेरीवाले यांच्याकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. ३० दिवसात संबधित विभागकडे सूचना व हरकती द्यावेत, असे आवाहन मुख्याधिकारी पूनम कदम यांनी यावेळी केले.

या यादीत ८५० फेरीवाल्यांचा समावेश असून या व्यतिरिक्त अद्याप कोणत्याही फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले नसल्यास त्यांनी नगरपालिकेशी संपर्क साधून सर्वेक्षण करून घ्यावे, ३० दिवसात आवश्यक कागदपत्रे देवून सर्वेक्षण करावे. कागदपत्रे न दिल्यास अर्ज निकाली काढण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकारी बाळासाहेब बगाडे यांनी सांगितले .

या बैठकी वेळी मुख्याधिकारी पूनम कदम, समितीचे सदस्य व जेजुरी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, कुलदीप फलफले, निलेश भुजबळ, स्वाती माळवदकर, संगीता चांदेकर, भारती आगाशे, कैलास खुडे, मीना सरोदे, जाणू लांघी, दतात्रय हरीचंद्रे, हरिदास रत्नपारखी, गौरी लांघी, सुंदर खोमणे, नागनाथ झगडे, अधिकारी बाळासाहेब बगाडे, अमर रणवरे उपस्थित होते  यावेळी समितीच्या सदस्यांना ओळख वाटप करण्यात आले. समितीच्या अध्यक्षा पूनम कदम यांचा सत्कार करण्यात आला.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like