जेजुरी : नाझरे सुपे येथे जावयाने चाकूने भोकसुन केला सासऱ्याचा खून

जेजुरी : पत्नीला नांदविण्यास पाठवीत नसल्याच्या कारणावरून बाचाबाची होऊ जावयाने सासऱ्याचा पोटात चाकूने भोकसून खून केला.जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील नाझरे सुपे येथे काल सांधकाळच्या वेळी हि घटना घडली.

जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार खून झालेल्या व्यक्तीचे नाव किसन देशा काळे वय 60 रा. नाझरेसुपे ता पुरंदर जि. पुणे असे आहे.

या खून प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की, मयत किसन देशा काळे हे नाझरे सुपे येथे राहत असून शेती करून ते उदरनिर्वाह करीत होते.12 वर्षांपूर्वी त्यांची मुलगी सुरेखा हिचा विवाह दौंड तालुक्यातील मिरवली येथील सुरेश सदाशिव भोसले यांच्याशी झाला होता.एक महिन्यांपूर्वी घरात भांडने व मारहाण झाल्याने सुरेखा हि माहेरी आली होती.शनिवार दि 8 रोजी सायंकाळच्या वेळी सुरेश भोसले हा पत्नीला नेहण्यासाठी नाझरे सुपे येथे आला. या वेळी घरातील सर्वजण शेतात होते. पत्नीला नांदविण्यास पाठवीत नसल्याने बाचाबाची होऊन जावई सुरेश भोसले याने सासरा किसन देशा काळे यांच्या पोटात चाकू भोकसून खून केला व तो पळून गेला.याबाबत नितीन किसन काळे यांनी या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली .

भोर उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी घटनास्थळी भेट दिली . या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर पोलीस हवालदार गणेश दाभाडे तपास करीत आहेत .