जेजुरीतील विकास कामांची नगराध्यक्षांकडून पाहणी

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत विविध योजनेतून रस्ते,गटारे आदी सुमारे साडेतीन कोटी रुपयांची कामे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडली गेली होती. हि कामे सध्या वेगाने सुरु झाली असून या कामांची पाहणी जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी केली .

जेजुरी पालिकेवर काँग्रेस पक्षाचे सत्ता असून निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनातील अनेक विकास कामे मंजूर होऊन ती सुरु करण्यात आली होती.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हि कामे बंद झाली होती. सध्या हि कामे सुरू झाली असून या कामांची पाहणी नगरध्यक्षा वीणा सोनवणे यांनी केली .

या मध्ये दीड कोटी खर्चाचा कडेपठार कमानी पासूनचा सिमेंट रस्ता,विद्यानगर परिसरातील 55 लक्ष रुपये खर्चाचे गटारीकरण,तसेच आनंदी हॉस्पिटल मागील रस्ता,हरपळे वस्ती रस्ता,नगर पालिका शेजारील रस्ता,अहिल्यादेवी चौक ते जानुबाई आळी रस्ता आदी कामांचा समावेश आहे .

जेजुरी पालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षाने जेजुरीच्या विकासासाठी जी आश्वासने दिली होती त्याची वचनपुर्ती म्हणून कोट्यवधी रुपयांची विकास कामे शहरात सुरु असून प्रत्येक प्रभागातील नागरिकांचे सहकार्य या विकास कामांना मिळत आहे, शहरातील सर्व कामे दर्जेदार असतील असे नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी सांगितले . यावेळी गटनेते सचिन सोनवणे नगरसेवक महेश दरेकर, बाळासाहेब सातभाई,सुशील राऊत, शीतल बयास यांनी विकास कामांची पाहणी केली .