जुनी जेजुरी परिसरात चार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – जेजुरी शहरातील जुनी जेजुरी परिसरातील सुमारे चार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भुमीपूजन आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे, नगराध्यक्षा वीणा सोनवणे, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, गटनेते सचिन सोनवणे, पाणी पुरवठा समितीचे सभापती गणेश शिंदे,नगरसेवक अजिंक्य देशमुख,बाळासाहेब सातभाई, बाळासाहेब दरेकर,रुक्मिणी जगताप, माजी नगरसेवक सदाशिव बारसुडे,
सुरेश उबाळे,बाळासाहेब काळे आदी उपस्थित होते.

जूनी जेजुरी परिसरातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण व सिमेंटचे करणे,बंदिस्त गटार योजना व पथ दिवे बसविणे व पिण्याच्या पाण्यासाठी जलवाहिन्या टाकणे आदी सुमारे चार कोटी रुपये खर्चुन कामे परिसरात केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

चार कोटी रुपये खर्चाच्या या कामामुळे जुनी जेजुरी व दत्तनगर परिसरात नागरी सुविधा मोठया प्रमाणावर मिळणार असल्याने परिसराचा कायापालट होईल असे पाणी पुरवठा समितीचे सभापती गणेश शिंदे यांनी सांगितले.आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नमुळे जेजुरी पालिकेच्या विकास कामासाठी निधी मिळत असल्याचे सांगत शहरात अनेक भागात विकासाची कामे सुरु असल्याचे नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी सांगितले.चंद्रकांत घाडगे यांनी नियोजीत कामाची माहीती दिली.