जेजुरीमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून सफाई कामगारांना किटचे वाटप

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात केलेले लाॅकडाऊन यामुळे सर्व सामान्य व गरीब माणसाला उपासमारीची वेळ आली आहे ह्या गरीब माणसांना दिलासा म्हणुन जेजुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या मंदिर या विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी किराणा मालाच्या किट चे वाटप केले.

जेजुरी नगर परिषदेमधील साफ सफाई कर्मचारी यांना या जीवनावश्यक वस्तूंच्या किट चे वाटप करण्यात आले,हा उपक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या मंदिर मधील सन १९९३/९४ मध्ये शिकत असलेल्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी राबवला आहे,या किट वाटपा प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या मंदिर माजी शिक्षक दत्तात्रय चासकर त्याचप्रमाणे हरीशचंद्र कराळे सर, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, जेजुरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पूनम कदम, जेजुरीच्या नगराध्यक्षा विणा सोनवणे यांच्या हस्ते या जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी राहुल घाडगे, साहिर शेख, राजेंद्र जावळेकर, अमोल भंडारी, तुषार देशमुख, हेमंत सोनवणे, मनोज आगलावे दिनेश सोनवणे, मंगेश डोंबे, नितीन पुरोहित, सतिष झगडे, राजाराम काळाने, प्रवीण शेरे, जावेद पठाण, सचिन कुंभार, आनंद गोलांडे, मनोज बारसोडे, शितल कदम, अविनाश भालेराव आदींनी केले होते