ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून पुरंदर हवेलीतील 2 लाख 10 हजार नागरिकांना होमोपॅथिक औषधे वाटप सुरु

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनावर मात करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आवश्यक आहे. आयुष मंत्रालयाच्या मान्यतेनुसार पुरंदर हवेली मधील २ लाख १० हजार नागरिकांना ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप सुरु करण्यात आले आहे. पुरंदर हवेलीतील प्रत्येक परिवार हा माझा परिवार असून त्यांची काळजी घेणे हि माझी जवाबदारी आहे असे पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी जेजुरी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

केंद्र शासनाच्या कचरामुक्त स्पर्धेत जेजुरी पालिकेला प्रथमच थ्री स्टार मानांकन मिळाले याबाबत आमदार संजय जगताप यांनी जेजुरी पालिकेला भेट देवून नगराध्यक्षा, नगरसेवक, मुख्याधिकारी व पालिका अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांचे अभिनंदन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार संजय जगताप म्हणाले की, गेली दोन महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरंदर हवेलीच्या नागरिकांची प्रशासन काळजी घेत आहे. तहसीलदार,महसूल विभागाचे सर्व कर्मचारी,आरोग्य विभाग,पोलीस विभाग,सासवड व जेजुरी पालिकेचे प्रशासन यांनी शासनाच्या सूचना तंतोतंत पाळल्यामुळे तालुका ९९ टक्के ग्रीन झोन होण्यास यशस्वी झाला आहे.

ग्रामीण भागात स्थलांतर होत असून संक्रमित रुग्ण वाढण्याची भीती नागरिकांच्यात आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना कोरंटाइन करण्याबाबतचे अधिकार नगरपालिका,ग्रामपंचायतीला शासनाने दिले आहेत त्याचे तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे. पुरंदर हवेलीतील प्रत्येक परिवार हा माझा परिवार असून त्यांची काळजी घेणे हि माझी जवाबदारी आहे असेही आमदार संजय जगताप यांनी सांगितले.

काहीजन खासगी लॅबमधून तपासणी करून घेत आहेत हे लॅब अधिकृत आहेत का हे पाहणे आवश्यक आहे. चुकीचे रिपोर्ट आल्यास प्रशासनास धारेवर धरले जाते,शहर व परिसराला वेठीस ठेवले जावू नये .कोरंटाइन बाबत काही लोक चुकीचा गैरसमज पसरवित आहेत. कोरोनाच्या या संकटावेळी राजकारण बाजूला ठेवून जबावादारीचे भान ठेवणे आवश्यक आहे असेही आमदार संजय जगताप यांनी सांगितले.

यावेळी ग्रामीण संस्थेचे संचालक डॉ सुमित काकडे यांनी संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अर्सेनिक अल्बम ३० या होमोपॅथिक औषधे वाटप करण्यात येणार आहे असे सांगून औषधांबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी जेजुरी नगरपालिकेच्या नगरध्यक्षा विना सोनवणे,उपनगराध्यक्ष गणेश निकुडे,गट नेते सचिन सोनवणे,मुख्याधिकारी पूनम कदम ,नगरसेवक अजिंक्य देशमुख,महेश दरेकर,बाळासाहेब सातभाई, गणेश शिंदे, तसेच रोहिदास कुंभार ,रमेश बयास, बाळासाहेब जगताप,माजी नगरसेवक हेमंत सोनवणे,अनिल वीरकर आदी उपस्थित होते.