जेजुरी : बेलसर मध्ये डॉक्टर आपल्या दारी उपक्रम

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – कै.विलास मामा जगताप यांच्या स्मरणार्थ कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर बेलसर मध्ये “डॉक्टर आपल्या दारी” हा उपक्रम श्री बालसिद्धनाथ प्रतिष्ठान हडपसर/ बेलसर व कैलास जगताप मित्र परिवार यांच्यावतीने राबवण्यात आला होता. कोवीड-19 म्हणजे कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गावातील नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही.

त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला,बालक हे छोटे मोठे आजार अंगावरच काढत आहेत. भविष्यात अशा आजारांचा त्रास होऊ शकतो याचा विचार करून प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी सोपानदेव हॉस्पिटल सासवड चे डॉ.संदीप होले तसेच डॉ.अविनाश बालगीर (M.D) त्यांची पूर्ण टीम बेलसर गावांमध्ये घरोघरी फिरून तापमान आणि इतर तपासण्या करीत आहेत. तसेच गावातील आशा ताई (वर्कर) प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर व बालसिद्धनाथ प्रतिष्ठानचे गणेश जगताप, किरण जगताप, अतुल जगताप, संजय जगताप, राजेंद्र जगताप, निखिल जगताप, तुषार कुदळे, निलेश जगताप, अविनाश बुधे व इतरही कार्यकर्ते सर्वत्र फिरून कोरोना विषयी जागृती करत आहेत.

आरोग्य तपासणीचे काम दोन दिवस चालणार असुन तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत तपासनी करण्यात येत आहे. हात-पाय-तोंड बाहेरून आल्यानंतर स्वच्छता होऊनच घरात प्रवेश करावा महत्वाच्या कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये असे आव्हान सर्व ग्रामस्थांना करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन कैलास जगताप ( सरचिटणीस भाजपा पुरंदर) मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.